महिलांनी आत्मनिर्भर होऊन पाल्यांच्या शिक्षणाला प्राधान्य द्यावे- गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे.
औसा प्रतिनिधी
थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांच्या सुविद्य पत्नी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये पुणे शहरामध्ये स्त्री शिक्षणाचा पाया रचला शिक्षणाशिवाय आपली प्रगती शक्य नाही म्हणून समाजातील अनिष्ट रूढी परंपरा देवभोळेपणा अंधश्रद्धा घालविण्या साठी सत्यशोधक समाजाची स्थापना करून फुले दांपत्यांनी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण केला त्यांचा आदर्श आचरणात आणून प्रत्येक महिलांनी स्वतः आत्मनिर्भर व्हावे आणि आपल्या पाल्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन गटविकास अधिकारी युवराज मेत्रे यांनी केले फत्तेपुर ता. औसा येथे आयोजित महिला सक्षमीकरण मेळावा पुरस्कार वितरण सोहळा व वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात गटविकास अधिकारी बोलत होते.
कांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधुन महिला मुक्ती दिनानिमित्त महिला सक्षमीकरण मेळाव्याचे आयोजन श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे मा.वि. फत्तेपूर येथे करण्यात आले. ग्रामीण जनता शिक्षण प्रसारक मंडळ चलबूर्गा, श्री संगमेश्वर बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ औसा, सावित्रीबाई फुले नागरी सह. पतसंस्था लातूर व सावित्रीबाई फुले महासंघ खरोसा यांच्या संयुक्त विद्यमाने महिला सक्षमीकरण समाजभूषण पुरस्काराचे वितरण व श्रीमती लक्ष्मीबाई ढेंकरे मा. वि. फत्तेपूर या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन असा दुहेरी कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सौ. सुनिता गिरवलकर मँडम यांची उपस्थिती होती तर प्रमुख पाहुणे म्हणून युवराज म्हेत्रे गट विकास अधिकारी, डॉ. सुवर्णा बिराजदार, हरिश्चंद्र सुडे, प्रा. दुष्यंत कटारे, यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली त्यानंतर ग्रामीण जनता शिक्षण प्रसारक मंडळ चलबुर्गा या संस्थेच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समाज भूषण पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेल्या मान्यवरांमध्ये डॉ. सुवर्णा बिराजदार, श्री हरिश्चंद्र सुडे, प्रा. चंद्रकला भार्गव, सौ. कुशावती बेळे, श्री व्यंकटराव पाटील दादा, श्री रामभाऊ कांबळे, प्रा. डॉ. दुष्यंत कटारे, प्रा. डॉ. पांडुरंग आचोले, श्रीमती एस.आर. मधाळे, श्री. एन. पी. सुर्यवंशी, श्री. संदीपान माळी, सौ. गंगासागर राऊतराव, श्री. बी.पी. सुर्यवंशी इ. चा समावेश होता.
कार्यक्रमास उपस्थित मा.श्री. युवराज म्हेत्रे गटविकास अधिकारी यांनी उपस्थित महिलांना व विद्यार्थ्यांना महिला सक्षमीकरणावर मोलाचे मार्गदर्शन केले व तसेच डॉ. सुवर्णा बिराजदार व प्रा. दुष्यंत कटारे यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले.
0 टिप्पण्या