औसा येथे आम आदमी पार्टीचे सदस्य नोंदणी अभियान सुरू..
औसा प्रतिनिधी
आम आदमी पार्टीच्या वतीने औसा शहरांमध्ये सदस्य नोंदणी अभियान मोहीम आयोजित करण्यात आली होती.त्या अनुषंगाने आज 9 डिसेंबर 2023 शनिवार रोजी सायंकाळी 6 वाजता मेनरोड औसा येथे सदस्य नोंदणी अभियान जिल्हाध्यक्ष अश्विन नलबले यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आले.यावेळी राजकीय पक्षाने जे गढूळ वातावरण केलेले आहे त्यामुळे सर्वसामान्य जनता पुर्णपणे वैतागली आहे.त्याच्यामुळे आम आदमी पार्टीचे सदस्य औसा शहरामध्ये वाढविण्यासाठी हे सदस्य नोंदणी अभियान औशात सुरू केलेले आहे.औसा शहरातल्या प्रत्येक वार्डामध्ये आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता शिबिरे संपन्न करुन मॅक्जीमम कार्यकर्ता बनविण्याचे काम शहरांमध्ये चालू आहे.सध्या औसा शहरानंतर पूर्ण तालूक्यामध्ये प्रत्येक गावा गावात जाऊन सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे.आणि मॅक्जीमम लोकांना आम आदमी पार्टी म्हणजे सर्व सामान्य जनता आहे.त्यांना आम आदमी पार्टीचे कार्यकर्ता बनवून घेण्याचे कार्य करणे सुरू आहे. कार्यकर्ता असतील तर कार्य करण्यासाठी पक्षाला जोर येतो,आणि कार्यकर्ता असतील तर आपले कार्य पण साध्य करता येतात.कारण एकट्या व्यक्तीचे काम नाही या राजकारणामध्ये एखाद्या मुद्दा उचलून धरल्यावर त्याला तडीस नेण्यासाठी एका व्यक्तीचे काम नाही.त्यासाठी सदस्यांची आवश्यकता असते . त्यासाठी सदस्य नोंदणी अभियान सध्या औसा शहरामध्ये जोरात सुरू आहे . असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष दगडु वसंत माने यांनी सदस्य नोंदणी अभियानात केले आहे.यावेळी सदस्य नोंदणी अभियानात शहराध्यक्ष अली कुरेशी, तालुका मिडीया प्रमुख मुख्तार मणियार,बाबर भाई शेख, शेख मुजीब, मुजम्मील शेख,आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या