औसा येथे महिला किर्तन महोत्सवाची पर्वणी ह भ प जयश्री तिकांडे यांच्या कीर्तनात उत्स्फूर्त प्रतिसाद

 औसा येथे महिला किर्तन महोत्सवाची पर्वणी ह भ प जयश्री तिकांडे यांच्या कीर्तनात उत्स्फूर्त प्रतिसाद


 औसा प्रतिनिधी

 औसा शहरातील ग्रामदैवत श्री मुक्तेश्वर देवालय न्यास च्या कलशारोहण सोहळ्याच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 15 ते 22 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये भव्य महिला किर्तन महोत्सव सुरू असून औसा शहर व परिसरातील भाविकांना कीर्तन महोत्सवाची आध्यात्मिक पर्वणी मिळत आहे. दिनांक 16 डिसेंबर 2023 रोजी ह भ प जयश्री कांडे संगमनेर जिल्हा अहमदनगर यांच्या कीर्तनात श्रोत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून डॉ सुनीता पाटील वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय, माजी नगरसेविका ऍड मंजुषा हजारे, डॉ. पल्लवी कल्याणी, रिंगण लाईव्ह चे संपादक राजू पाटील, युवा उद्योजक पवन राजट्टे आदी मान्यवर उपस्थित होते. मुक्तेश्वर मंदिर समितीच्या वतीने ह भ प जयश्रीताई तिकांडे व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ह भ प जयश्री तिकांडे यांनी आपल्या कीर्तनातून भाविक भक्तांचे चांगल्या प्रकारे प्रबोधन केले. कडाक्याच्या थंडीतही रसिक स्रोत यांनी कार्यक्रमास उस्फुर्त प्रतिसाद देत उपस्थिती नोंदविली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवराज हलकुडे यांनी केले श्री मुक्तेश्वर देवालय नाशिक मुक्तेश्वर वागदरे, धनंजय कोपरे, प्रकाश वाघमारे, उमाकांत मुर्गे, रविशंकर राचट्टे, ऍड बी एस कारंजे आधी मान्यवरांनी महिला किर्तन महोत्सवाचे उत्कृष्ट आयोजन केल्यामुळे भाविकातून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या