लातूर जिल्हा नियोजन समितीवर डॉ. अफसर शेख यांची नियुक्ती..
औसा प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेल्या लातूर जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर ग्रामीण जिल्हा अध्यक्ष तथा औसा नगर परिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष डॉ अफसर नवाबुद्दीन शेख यांची नियुक्ती राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या शिफारशी वरून महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाच्या उपसचिव नितीन खेडकर यांनी राज्याचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार केली आहे.
लातूर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विकासाचा आराखडा तयार करून ग्रामीण भागाला विकासाच्या माध्यमातून चालना देण्याचे कार्य तसेच आर्थिक तरतूद करून भरीव विकास करण्याच्या संकल्पना लातूर जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून होत असतात. या नियोजन मंडळाच्या समितीवर डॉ. अफसर शेख यांच्यासारख्या अभ्यासू व अनुभवी व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या नेतृत्वाला संधी मिळाली आहे. डॉ. अफसर शेख यांच्या या नियुक्ती बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी जिल्हा परिषद सदस्य बबनराव भोसले, जावेद शेख, मुजाहिद शेख, मेहराज शेख, कृष्णा सावळकर, गोविंद जाधव, अविनाश टिके, वकील इनामदार, रुपेश दुजनकर, मुकेश तोवर, संगमेश्वर उटगे, प्रदीप मोरे, बालाजी शिंदे मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप मोरे बालाजी शिंदे इत्यादींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
0 टिप्पण्या