विध्यार्थ्यांनो संशोधनात आणि क्रीडा क्षेत्रात यशस्वी करिअर करा - ना. संजय बनसोडे

 *विध्यार्थ्यांनो संशोधनात आणि क्रीडा क्षेत्रात यशस्वी करिअर करा - ना. संजय बनसोडे



औसा (प्रतिनिधी) :


 औसा तालुक्यातील आलमला येथील विश्वेश्वर संकुलात शिक्षण विभाग, पंचायत  समिती औसा व विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय आलमला यांच्या संयुक्त विद्यमाने ५१ वे तालुका स्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन व ३ रे विश्वेश्वर प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन

क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. संजय बनसोडे यांच्या शुभ हस्ते व प्रमुख पाहुणे माध्यमिक शिक्षण अधिकारी नागेश मापाडी, उपशिक्षणाधिकारी क्षीरसागर साहेब, गट विकास अधिकारी युवराज म्हेत्रे, गट शिक्षण अधिकारी औसा गोविंद राठोड, डॉ. बसवराज ममलशेट्टे, राजू पाटील, शिरीष उडगे, समद शेख, संस्था अध्यक्ष शिवचरण धाराशिवे, उपाध्यक्ष प्रभाकर कापसे, सचिव बसवराज धाराशिवे, सहसचिव महादेव खिचडे, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालयचे प्राचार्य प्रशांत धाराशिवे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. 

या कार्यक्रमाचे प्रस्तावीक सचिव बसवराज धाराशिवे यांनी करताना संस्थेने केलेल्या यशस्वी वाटचालीचे सखोल असे मार्गदर्शन करून संस्था स्थापनेपासूनच सामाजिक बांधिलकी जोपासताना संस्थेअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा उपक्रमाचे माहिती देऊन संस्थेच्या अंतर्गत उपक्रमात विध्यार्थ्यानी राष्ट्रीय, राज्य स्तरीय स्तरावर मिळविलेल्या प्रावीण्याचा विशेष उल्लेख करून ग्रामीण भागातून संस्था शैक्षणिकच नव्हे तर विध्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रमाच्या माध्यमातून संस्था कार्य करत असल्याचे सांगितले. 

या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी क्रीडा व युवक कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य मा. ना. संजय बनसोडे यांनी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना या संस्थेच्या अंतर्गत राबवल्या गेलेल्या राष्ट्रीय तसेच राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून संस्थाचालकांचे कौतुक केले व विध्यार्थ्यांना क्रीडा क्षेत्रातही यशस्वी करिअर करण्याचे आवाहन केले. क्रीडा क्षेत्रात लागणाऱ्या सर्व सुविधांची मी क्रीडा मंत्री म्हणून पूर्ण करण्यास कटिबद्ध असल्याचे सांगितले आहे.  पुढेंहि बोलताना ग्रामीण भागातूनच बालवैज्ञानिक व क्रीडापटू अश्या संस्थांच्या उपक्रमातूनच घडले जातात असे उपक्रम संस्था राबविते त्यासाठी संस्था चालकाचे मनापासून अभिनंदन केले. 

या ५१ वे तालुका स्तरीय शालेय विज्ञान प्रदर्शन मध्ये औसा तालुक्यातून प्राथमिक व माध्यमिक गटातून १०६ शाळांनी सहभाग नोंदविला होता तसेच ३ रे विश्वेश्वर प्रिमीअर लिग क्रिकेट स्पर्धेसाठी लातूर ज़िल्हा व परिसरातून ३२ क्रिकेट संघाने सहभाग नोंदविला. या कार्यक्रमाच्या उदघाटन प्रसंगी ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुल व  ब्ल्यू बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेज च्या विध्यार्थ्यानी सांस्कृतिक कार्यक्रम द्वारे प्रेक्षकांची मने जिंकली. 

या कार्यक्रमास संस्थेअंतर्गत असलेल्या शिवलिंगेश्वर कॉलेज ऑफ फार्मसी, दगडोजीराव देशमुख डी. फार्मसी, विश्वेश्वरय्या अभियांत्रिकी पदविका महाविद्यालय, विश्वेश्वरय्या औद्योगिक प्रशिक्षण संस्था, ब्ल्यू बर्ड इंटरनॅशनल स्कुल व  ब्ल्यू बर्ड ज्युनिअर सायन्स कॉलेज च्या सर्व युनिटचे प्राचार्य, विभाग प्रमुख व प्राध्यापक वृन्द, शिक्षकेत्तर कर्मचारी व विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्र संचालन विभाग प्रमुख अंकुश बिडवे यांनी तर आभार प्रदर्शन सहसचिव महादेव खिचडे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या