चतुर्वेदी मौलाना अब्दुल्ला सालीम यांचे लातुरात व्याख्यान
लातूर: जमीयत उलेमा ए हिंद (अरशद मदनी) जिल्ला लातूर यांच्या वतीने गुरुवार 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आज़म गंज मस्जिद रोड़ येथे कुराण आणि सद्यस्थिती या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. कुराणचे गाढे अभ्यासक मौलाना अब्दुल्ला सालीम साहब कासमी चतुर्वेदी यावेळी व्याख्यान देणार आहेत. समाजबांधवांनी उपस्थित रहावे, असे आवाहन जमीयत उलेमा लातूर जिल्ह्याध्यक्ष मौलाना इस्राइल साहब रशीदी, मौलाना बिलाल साहब मज़ाहीरि,सरफराज सय्यद, आसिफ बिल्डर तसेच समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या