विश्वभारती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांतर्फे मोफत आरोग्य योग्य विज्ञान शिबिर...

 विश्वभारती बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांतर्फे मोफत आरोग्य योग्य विज्ञान शिबिर...



औसा प्रतिनिधी



 विश्वभारती बहुउद्देशीय सेवाभावी संस्था द्वारा  मोफत आरोग्य योग्य विज्ञान शिबिर चे आयोजन करण्यात आले.

 *श्री मुक्तेश्वर प्राथमिक विद्यामंदिर औसा येथे चार दिवसाचे योग शिबिर दिनांक 18 -12- 23 ते 21- 12- 23 या दरम्यान घेण्यात आले या शिबिरास रामदेव बाबा यांचे शिष्य योगशिक्षक हनुमंत जी साळुंके यांनी सर्वांना योग प्राणायाम आरोग्य विषयी माहिती दिली .या शिबिरामध्ये शेकडो माता भगिनी, जेष्ठ मंडळी व तरुण मित्रांनी सहभाग नोंदवला. या शिबिरा चे उद्घाटन बाल तपस्वी श्री श्री 108 निरंजन शिवाचार्य महास्वामी यांच्या हस्ते झाले . याप्रसंगी वीरशैव लिंगायत समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप जी मोरे, सुरेश आप्पा ठेसे, प्रदीप जी स्वामी इतर मान्यवर उपस्थित होते.

निरोगी जीवन जगण्यासाठी योग व प्राणायाम किती महत्त्वाचा आहे हे साळुंके सरांनी सर्वांना पटवून दिले.

*सर्वांनी प्राणायाम शिकल्यानंतर श्री साळुंके सर व या कार्यक्रमाचे आयोजक प्रा शिवरुद्र मुरगे सर यांचे आभार मानले.

*या कार्यक्रमाच्या समारोपात नगरपरिषद चे गटनेते सुनील  उटगे, संदिपान काका जाधव ,ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ कांबळे, नितीन  शिंदे, प्रतिष्ठित व्यापारी सोमा भाऊ वागदरे, सतीश काका केवळराम, मोहन तात्या नलगे, नारायण काका माळी, अनिल जी पांडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या