औसा शहरात डुकरावर संक्रांत- रोगराईमुळे जागोजागी डुक्कर मृत्युमुखी
औसा प्रतिनिधी
औसा शहरांमध्ये डुकरांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यातच डुकरावर रोगराईचे संकट आल्यामुळे शहरात जागोजागी अज्ञात रोगामुळे डुक्कर मरून पडल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. अज्ञात रोगामुळे डुकरामध्ये मरणाचे प्रमाण वाढले असून ठीक ठिकाणी डुक्कर मरून पडल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच औसा शहरांमध्ये अवकाळी पाऊस पडल्यामुळे दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे. शहरांमध्ये जागोजागी नाल्या कोंडल्या असून नाली वर डासाचे प्रमाण हे वाढल्यामुळे साथीचे रोग बळावत आहेत. चिकनगुनिया, डेंगू, सदृश्य रोगामुळे नागरिक हे आजारी पडत असल्याच्या तक्रारी येत असून शहरातील सर्व दवाखान्यामध्ये रुग्ण संख्या वाढली आहे. गल्ली बोळामध्ये रोगामुळे डुक्कर मरून पडल्यानंतर नागरिक कैकाडी समाजाच्या अध्यक्षांना सूचना देत असून अखिल भारतीय कैकाडी महासंघाचे अध्यक्ष लिंबराज जाधव यांना विचारणा केली असता त्यांनीही डुकरावर रोगराईचे संकट आल्याच्या दिला असून मरण पावलेले डुक्कर कैकाडी समाजाच्या स्मशानभूमीमध्ये जेसीपीद्वारे खड्डा खोदून आम्ही पुरत आहोत. जेणेकरून नागरिकांना दुर्गंधीचा कसलाही त्रास होणार नाही याची खबरदारी समाजाच्या वतीने घेतली जात असल्याची माहिती त्यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. औसा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी अजिंक्य रणदिवे यांनीही या कामे लक्ष घालून शहरांमध्ये वाढत्या वराहसंख्येला आळा घालण्या कमी योग्य ते कार्यवाही करावी व शहरातील सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरल्यामुळे व अवकाळी पावसामुळे जागोजागी आणि नाली मध्ये कचरा अडकलेल्या ठिकाणच्या नाल्या कचरा काढून वाहत्या करून घ्याव्यात तसेच नालीवर व शहरात ठीक ठिकाणी जंतुनाशक औषधाची फवारणी व धूर फवारणी करून साथीच्या रोगाला आळा घालण्याच्या कामी उचित कार्यवाही करावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
0 टिप्पण्या