सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भादा रोडवरील अतिक्रमणावर बुलडोझर

 सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने भादा रोडवरील अतिक्रमणावर बुलडोझर


 औसा प्रतिनिधी 

औसा शहरांमध्ये लातूर वेस हनुमान मंदिरापासून भादा रोडवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत होती. नागरिकांनी रस्त्याच्या समोरील बाजूस मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केल्यामुळे रस्ता अरुंद झाला होता तसेच लहान मोठे अपघात सातत्याने होत होते सध्या साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू असून ऊस वाहतूक करणारे ट्रक आणि ट्रॅक्टर प्रवासी बसेस शाळा महाविद्यालयाच्या स्कूल बस, टेम्पो, झिप व मोटरसायकल चालवणाऱ्या नागरिकांना या रस्त्यावरून अतोनात त्रास सहन करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभाग औसा च्या वतीने नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाचे सहकार्य घेऊन शुक्रवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी अतिक्रमण हटवण्याची मोहीम धुमधडाक्यात राबवीत भादा रोडवर असलेले अतिक्रमांवर सार्वजनिक बांधकाम विभागाने बुलडोझर फिरविले. लातूर वेस हनुमान मंदिरापासून भादा रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावर दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्यामुळे रस्त्यावर भाजीपाला, भुसार विक्री व फेरीवाले बसून व्यवसाय करीत होते तसेच या रस्त्यावरील वाढत्या अतिक्रमणामुळे रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत होता त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम राबवीत बुलडोजर च्या साह्याने अतिक्रमण काढले. या रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे अनेक व्यवसायिकांचे दुकाने व व्यवसाय उध्वस्त झाले आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या औसा विभागाचे अभियंता रोहन जाधव यांनी नगरपरिषद व पोलीस प्रशासनास पत्र देऊन सहकार्य मागितले होते. नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने लातूर वेस हनुमान मंदिरापासून भादा रोड कडे जाणाऱ्या रस्त्यावरील अतिक्रमण काढल्यामुळे या रस्त्याने एक डिसेंबर रोजी अखेर मोकळा श्वास घेण्यास सुरुवात केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या