उद्योग निर्मितीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा - आ. अभिमन्यू पवार
स्वयंरोजगार निर्मिती व महिला सक्षमीकरण एकदिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न ...
औसा प्रतिनिधी
औसा - कुटुंबाच्या कल्याणासाठी प्रत्येक महिलेनं शेतीपूरक व्यवसाय करण गरजेचं आहे. म्हणजे आपलं शेत कसे करता येईल आणि व्यवसायही सहजपणे होईल. शेतीसोबत करता येणारे व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय, शेळीपालन , कुक्कुटपालन व मुरघास आजच्या कार्यशाळेत आपल्याला हे ४ व्यवसाय शासकीय मदतीने कसं करता येईल याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे, आणि त्यातील तुम्हाला काय हवे आहे ते मला सांगा. या व्यवसायांना ५० टक्के पासून ७५ टक्के अनुदान आहे, उर्वरित खर्चासाठी बँकांमार्फत कर्ज मिळण्याची तरतूद सुद्धा आहे. म्हणजे शून्य गुंतवणुकीत सुद्धा तुम्ही हे व्यवसाय करु शकता. शासकीय कार्यालयात खेटे मारले तरी योजनांचे लाभ नीट मिळत नाहीत, पण मी तुमच्यासाठी योजनांचे लाभ घेऊन तुमच्यापर्यंत आलो आहे.आता महिलांनी या माध्यमातून उदयोग निर्मितीसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहन आमदार अभिमन्यू पवार यांनी केले आहे.ते (दि.१) डिसेंबर रोजी औसा येथे क्रिएटिव्ह फाऊंडेशन व अॅग्रो प्रोड्युसर कंपनीव्दारे आयोजित स्वयंरोजगार निर्मिती व महिला सक्षमीकरण एकदिवसीय कार्यशाळेत बोलत होते.
याप्रसंगी मंचावर लातूर च्या जिल्हाधिकारी वर्षा घुगे -ठाकूर ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर ,अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तडवी ,उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे ,पशुसंवर्धन प्रादेशीक सहआयुक्त डॉ नाना सोनवणे ,उपायुक्त नानासाहेब कदम ,सहआयुक्त डॉ गिरमे ,जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ श्रीधर शिंदे ,लीड बॅंकेचे व्यवस्थापक श्री शिंदे ,तहसीलदार भरत सूर्यवंशी ,गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे ,अॅग्रो प्रोड्युसर कंपनीच्या अध्यक्षा सौ. शोभा अभिमन्यू पवार ,क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे सचिव सुहास पाचपुते ,लातूर अर्बन बँकेचे कार्यकारी संचालक भंडारी ,स्मार्ट योजना प्रमुख निलेश खलाटे ,अॅड परिक्षीत पवार ,सोपान अकेले ,कल्पना डांंगे ,कल्पना ढविले ,सोनाली गुळबिले ,शिवगंगा मुरगे आदीसह महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होत्या.यावेळी आ.अभिमन्यू पवार पुढे बोलत होते की ४ जून, २०२२ रोजी मा देवेंद्रजी शेतरस्त्यांच्या आणि फळबाग लागवड व जनावरांसाठीच्या गोठ्याच्या लोकार्पणासाठी औसा येथे आले होते त्या कार्यक्रमाला महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर आला होता. त्या कार्यक्रमात मा देवेंद्रजींनी मला एक सूचना केली होती की "शेतरस्त्यांप्रमाणेच महिला वर्गाच्या कल्याणासाठी भरीव काहीतरी काम करा आता या कार्यक्रमाच्या निमिताने त्या सूचनेच्या अंमलबजावणीला सुरुवात होत आहे.२०१९ ची निवडणूक असो किंवा त्यानंतरचे ४ वर्ष, मतदारसंघातील माता भगिनी कायमच ताकदीने माझ्या पाठीशी उभ्या राहिल्या. त्यामुळे महिला भगिनींसाठी काहीतरी भरीव कार्य करणं हे मी कर्तव्य समजतो, माझं मागचे ४ वर्ष "शेतकरी हा माझ्या कार्याचा केंद्रबिंदू होता, आता पुढच्या काळात महिला सक्षमीकरणावर काम केले जाणार आहे.पुरुषांच्या कमाईपेक्षा महिलांच्या हाताला ४ पैसे मिळाले तर ते कुटुंबासाठी अधिक लाभदायक असतात. महिला कमाईचा रुपया ना रुपया आपल्या संसारालाया घालतात त्यामुळे एखाद्या कुटुंबाचे कल्याण करायचे असेल तर त्या कुटुंबातील महिलांचे सक्षमीकरण झाले पाहिजे.असे सांगून महिलांनी व्यवसाय वैयक्तिक पातळीवर करण्यापेक्षा बचत गटांच्या माध्यमातून करा. बचत गट असेल तर जास्त जनावरे सांभाळण शक्य होईल मोठा व्यवसाय करता येईल.केंद्र आणि राज्यात महिलांच्या कल्याणासाठी काम करणारे सरकार आहे, त्याचा फायदा घ्या उद्योग निर्मितीसाठी पुढे आवश्यक असून त्यासाठी बॅकेचेही सहकार्य निश्चित मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी तर आभार सौ शोभा अभिमन्यू पवार यांनी मानले .सुत्रसंचालन दिपक चाबुकस्वार व अॅड श्रीधर जाधव यांनी केले.या कार्यशाळेसाठी मतदारसंघातील पाच हजाराच्या वर महिला उपस्थित होत्या.यावेळी राष्ट्रीय पशुधन अभियान अंतर्गत उद्योजकता विकास योजनेची माहिती चित्रीकरणव्दारे देण्यात आली.
.............................
संकल्प करा तुमच्या कष्टाचे पैसे बॅकेत पडले पाहिजेत - जिल्हाधिकारी वर्षा घुगे -ठाकूर
महिला बचत गटाच्या माध्यमातून स्वयंरोजगार करीत असताना तुम्हाला व्यवसायिक अनुभव आला आहे.आता तुम्ही स्मार्ट महिला म्हणून पुढे येत आहेत.शासनाच्या माध्यमातून आमदार अभिमन्यू पवार महिलांच्या सबलीकरणासाठी सर्व बाजुने प्रयत्न करीत आहे.आता महिलांनी पुढे येण्याची गरज आहे.महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी शासनाच्या योजनेचा लाभ घेणे आवश्यक आहे.या दुष्टीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून आशा उद्योग व्यवसायातून लातूर पॅटर्न महिलांचे सबलीकरण पॅटर्न म्हणून उदयास येऊ शकेल येणाऱ्या जानेवारीपासून संकल्प करा कि तुमच्या कष्टाचे पैसे बॅकेत पडले पाहिजेत या योजनेतून तुम्हाला कुक्कुटपालन ,शेळीपालन ,अंडी निर्मितीसह योजनेचा लाभ घेता येणार असल्याचे सांगून याठिकाणी येवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आल्या आहेत याचा मनस्वी आनंद झाला असल्याचेही त्यांनी आवर्जुन उल्लेख ते केला .
0 टिप्पण्या