छावा संघटनेचा औसा तहसिल कार्यालयासमोर जोडे मारो आंदोलन..
औसा प्रतिनिधी
सध्या लातूर जिल्हा दुष्काळ जाहीर करून लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट अग्रीम पीकविमा तात्काळ शेतक-यांच्या खात्यावरती तुरंत जमा करावे. तसेच येणाऱ्या कांही दिवसांमध्ये जिल्ह्यामध्ये जनावरांचाही चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. त्यामुळे लातूर जिल्ह्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणून जिल्हाधिकारी यांनी तात्काळ महाराष्ट्र शासनाला. लातूर जिल्ह्यातील दुष्काळाची परिस्थीती शासकीय स्तरावरती तात्काळ कळवावी तसेच लातूर जिल्ह्यातील सर्व पक्षीय
आमदार हे निष्क्रिय आहेत. यांनी लातूर जिल्ह्याच्या दुष्काळबाबत व पिकविम्या बाबत कसलीही चर्चा विधान परिषदेमध्ये व कंपन्यासोबत केलेली नाही. यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेच्या वतीने
जिल्ह्यातील पालक मंत्र्यासह आमदारांच्या प्रतिमेला जोडा मारून निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शेतकरी नेते तथा छावाचे विजयकुमार घाडगे पाटील, भगवानदादा माकणे, दिपक नरवडे, मनोज लंगर, ज्ञानेश्वर सूर्यवंशी, मनोज फेसाटे, अंकुश शेळके, बाजीराव एकुगे, वैभव गोमसाळे, समाधान जाधव, नितीन साळुंके, पांडुरंग कोळपे, शिवशंकर सुर्यवंशी, रमाकांत करे बालाजी माळी, गोपाळ चाळक, केशव पाटील, कैलास शिंदे, पंडीत चव्हाण, लक्षमण चव्हाण, सचिन पवार, सुदर्शन उमाले, गणेश घाडगे मारुती मुडबे, अनिल डोंगरे, सुर्यवंशी यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या