औसा तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर करा - राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्रा मध्ये महा-मदत प्रणालीव्दारे मुल्यांकन करुन काही तालुक्यांना दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात आले परंतु या मध्ये औसा तालुक्याचा समावेश करण्यात आलेला नाही. वास्तवीक पहाता खरीप हंगाम 2023 मध्ये पावसाळा सुरु असुन ही सरासरीच्या 40 % सुध्दा पाऊस झाला नाही याचा जबर फटका खरीप हंगामाला तर बसलेला आहेच परंतु रब्बी हंगाम सुध्दा संकटात सापडले आहे.
औसा तालुक्यामध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस, पावसाचा खंड, जमीनील पाणी पातळीतील घट, पिक पेरा व अपेक्षीत उत्पन्नात 50 % पेक्षा जास्त घट जनावराच्या चा- यांचा गंभीर प्रश्न पिण्याच्या पाण्याची टंचाई व पाणीपुरवठा होणा-या जल स्रोताची स्थिती या सर्व गोष्टीची परीस्थिती गंभीर असुन औसा तालुक्यात दुष्काळ जाहीर होणे गरचेचे आहे. त्यामुळे येथील शेतक-यांना येणा-या काळात NDRF व SDRF च्या निकषा नुसार मदत मिळु शकेल त्यामुळे औसा तालुक्याला दुष्काळ ग्रस्त जाहीर करण्यात यावा. या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष भरत सुर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली औसा तहसीलदार यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन देण्यात आले. आहे.यावेळी निवेदन देताना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष आत्माराम साळुंखे, तालुकाध्यक्ष बाळासाहेब जाधव, कार्याध्यक्ष वसीम बोपले, विधानसभा अध्यक्ष अशोक गरड, तालुका उपाध्यक्ष दत्तात्रय जाधव, सचिन पवार, आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या