आलमला गावाचा कायापालट करण्यासाठी एक वेळ संधी द्या- सरपंच पदाचे उमेदवार दौलतराव वाघमारे
औसा प्रतिनिधी
आलमला ग्रामपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थेट जनतेतून सरपंच पदाचे उमेदवार म्हणून मी मतदारांच्या आशीर्वाद घेऊन या निवडणुकीमध्ये उभा आहे आज मला गावातील प्रत्येक समाजाच्या आणि प्रत्येक जाती-धर्माचे विश्वासाला पात्र राहून गावामध्ये सामाजिक सलोखा ठेवून आम्हाला गावचा का पालट करण्याचा आपला संकल्प आहे मतदाराने एक वेळ संधी द्यावी मी आलमला गावचा काया पालट करण्यासाठी मतदान रुपी आशीर्वाद माझ्या पाठीशी उभे करावेत असे आवाहन सरपंच पदाचे उमेदवार दौलतराव वाघमारे यांनी केले. समाजातील सांस्कृतिक सभागृह स्मशानभूमी साठी येणाऱ्या काळात आपण भरघोस निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहोत तसेच महाराष्ट्र ग्रामीण रोजगार योजनेचा सदस्य म्हणून शेतकऱ्यांना व ग्रामस्थांना वैयक्तिक लाभाच्या योजना मिळून ग्रामस्थांच्या विकासाला चालना देण्यासाठी आपण वचनबद्ध आहोत. गावाची लोकसंख्या आणि व्याप्ती वाढल्यामुळे बेघरांना रमाई आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रभावीपणे राबवून घरकुल योजनेचे स्वप्न साकार करू असे आश्वासन दिले. गावातील सर्व मतदारांच्या वैयक्तिक गाठीभेटी घेऊन आपण आपली विकासाची भूमिका जनतेसमोर मांडले असून ग्रामस्थांचा आपल्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे असेही दौलतराव वाघमारे यांनी यावेळी म्हटले.
0 टिप्पण्या