सरकारची दिवाळी अन.. शेतकऱ्यांचे दिवाळे काढल्याच्या निषेधार्थ लातूर येथे चटणी भाकर आंदोलन..
लातूर / प्रतिनिधी-
दहा वर्षापासून शेतकर्यांशी जर रामराजाच्या गप्पा मारुन बळीराजाची पिळवणूक आणि फसवणुक करणार्या राज्य व केंद्र सरकारने आनंदाच्या दिवाळीत माती कालवण्याचे महापाप केले आहे. आगामी निवडणुकीत अशा जुलमी सरकारला शेतकरी उध्वस्त करेल अशी गर्जना शेतकरी नेते राजेंद्र मोरे यांनी केली आहे.
लातूर येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्या समोर सत्तार पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली अरुणदादा कुलकर्णी यांनी चटणी भाकर आंदोलन केले. त्यावेळी पक्षाचे व संघटनांच्या झेंडे बाजूला ठेवून शेतकर्यांसाठी एकत्र येण्याचे श्री. रविकांत तुपकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अनोखे आंदोलन केले आहे. यावेळी श्री मोरे बोलत होते.
१० वर्षापूर्वी तत्कालीन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणविस, पाशा पटेल यांनी सोयाबीनला सहा हजार प्रतीक्विंटल भाव मिळावा म्हणून संपूर्ण मराठवाडा भर शेतकरी दिंडी काढून खोट्या आश्वासनाची खैरात करून गेले १० वर्ष केंद्रात आणि राज्यात यांच्या विचाराचे सरकार सत्तास्थानी आले आहे. मग आपण केलेली मागणी पूर्ण करण्यास यांना काय अडचण असा सवालही आंदोलनाचे मार्गदर्शक सत्तार पटेल यांनी केला आहे.
असंख्य शेतकरी आज ऐन दिवाळीत चटणी भाकर घेवून प्रतीकात्मक स्वरुपात आंदोलन करतात व गावो गावी आज दिवाळी नसून त्या शेतकर्याचे जणू दिवाळेच आहे. अशी स्थीती पहावयास मिळत आहे. म्हणून सरकारला जाब विचारण्यासाठी हे आंदोलन करीत असलेचा निर्धार अरुण दादा कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. यावर्षीचा खरीप हंगाम हातातून पुर्ण पणे निसटून गेलेला आहे. आणि रबी हंगाम अजिबात येणारच नाही हे माहित असताना सुद्धा सरकार व सरकारमधील मंत्री, आमदार, खासदार, आनंदात आप आपल्या घरी मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करत आहेत. जणू राजाला दिवाळी काय माहित! एकिकडे शेतकरी अडचणीत असताना चटणी भाकर खावून दिस येतील, दिस जातील, भोग सरल, सुख येईल या उद्याच्या आशेवर जगतो आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी लाखो शेतकर्यांचा एलगार मोर्चा बुलढाणा येथे आयोजित केलेला आहे. त्यात प्रामुख्याने १०० टक्के पिकविमा मिळाला पाहिजे, २५ टक्के अग्रीम पिक विमा नुकसान भरपाई म्हणून त्वरीत द्यावा दुष्काळ जाहीर करावा, सोयाबीनला ९ हजार प्रतिक्विल भाव मिळावा नियमित कर्ज फेड करणार्या शेतकर्याना ५० हजार प्रोत्साहन अनुदान द्यावे. इत्यादी प्रमुख मागण्या आहेत. यासाठी लातूर जिल्ह्यातून हजारो शेतकरी श्री. तुपकर यांच्या नेतृत्वाखालील बुलढाण्यातील मोर्चाला जाणार असल्याची घोषणा राजीव कसबे यांनी केली.
यावेळी सत्तार पटेल, अरुण दादा कुलकर्णी, राजेंद्र मोरे, राजीव कसबे, नवनाथ शिंदे, अशोक दहिफळे, रामदास गिरी, गुरुलिंग मोदी, बशीर पठाण, बालाजी केंद्रे, रामराव दहिफळे, उद्धवराव दहीफळे, शाम जाधव, हनमंत सुरवसे, संदिपान सुरवसे, बालाजी जाधव, मुक्ताराम काळे, संपत गायकवाड, मुस्तफा देशमुख, सुरेश सुर्यवंशी, गौतम कांबळे, बालाजी पाटोळे, सिताराम किनीकर, दगडू बरडे, मोहन चौरे, दिपक गंगणे, कावेरीताई विभूते, उषाताई गवळी, प्रकाश घोरपडे, ओम हजारे, संतोष गायकवाड, अशोकराव नानजकर इत्यादी जण उपस्थित होते.
0 टिप्पण्या