अफसर शेख युवा मंचचा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणास जाहीर पाठींबा .

 अफसर शेख युवा मंचचा महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षणास जाहीर पाठींबा .



औसा प्रतिनिधी


 सद्या महाराष्ट्रभर मराठा समाजास आरक्षणासंदर्भात जी मागणी केली जात आहे ती योग्य व रास्त आहे. मराठा समाजाचे मागासलेपण हे विविध सर्वेक्षण व समित्याद्वारे सिध्द झाले आहेत. त्यामुळे मराठा समाजास आरक्षण देणे हे न्यायोचित असून मराठा समाजास आरक्षण देणे हे काळाची गरज आहे. यासंदर्भात आमरण उपोषणास बसलेले श्री. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ औसा येथे होत असलेल्या साखळी उपोषणास अफसर शेख युवा मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉ अफसर शेख यांच्या अध्यक्षतेखाली  पाठीब्यांचे पत्र देण्यात आले. तरी आपणास विनंती की इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणास धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यात यावे. या पाठिंब्याचे पत्र 30 अॉक्टोंबर सोमवार रोजी देण्यात आले.यावेळी अफसर शेख युवा मंचचे जावेद शेख, गोंवीद जाधव, अविनाश टिके,साजीद काझी,म.युनुस चौधरी,उमर पंजेशा, आनंद बनसोडे,बासीद शेख, युवराज कसबे, कृष्णा सावळकर, राहुल मलवाड यांच्यासह  मराठा आरक्षणास पाठिंब्याचे पत्र देताना उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या