मराठा आरक्षण साखळी उपोषणास समदर्गा युवकांचा लक्षवेधी पाठिंबा
औसा प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी औसा तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू असून उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तालुक्यातील समदर्गा गावातील युवकांनी लातूरवेस हनुमान मंदिरातील मूर्तीला श्रीफळ फोडून जय भवानी जय शिवाजीचा जयघोष करीत तहसिल कार्यालयासमोर आयोजित केलेल्या साखळी उपोषणास सहभाग घेत लक्षवेधी पाठिंबा दिला. यावेळी सर्वश्री धनराज बोंबडे, विनोद सागर, व्यंकट जाधव, नवनाथ ढोक, बाबासाहेब थोरात, किरण भोपी, अजय सगर, करण मोहिते, बबलू जाधव, महेश गरगडे, अनिल लाड, सोपान गोमदे, विशाल गुळविले, तानाजी ढोक, सचिन पवार, बापू मोहिते, महेश यादव, तेजस काळे, हरिभाऊ डोरले इत्यादी कार्यकर्ते सहभागी झाले होते. यावेळी दिव्यांग भव्य क्रांती संघटनेचे आत्माराम मिरकले यांनी मराठा आंदोलनास पाठिंबा असल्याचे पत्र आंदोलन करताना स्वाधीन केले.
0 टिप्पण्या