मराठा आरक्षणाची मशाल पेटली.
सरपंच संघटनेचा वाढता
पाठिंबा.
औसा प्रतिनिधी
मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या साखळी उपोषणास पाठिंबा म्हणून औशात तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू असून मराठा आरक्षणाची मशाल आता पेटली आहे. औसा तालुका सरपंच संघटनेने या आंदोलनास पाठिंबा दिला असून अपंग संघटना तसेच औसा तालुका शहर काँग्रेस कमिटी एमआयएम या पक्षानेही सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मराठा आरक्षणास पाठिंबा असल्याचे पत्र दिले आहे. सोमवारी पंडित कदम यांच्या नेतृत्वाखाली लखनगाव येथील युवकांनी तहसीलदार औसा यांना मराठा आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणी केली आहे. या निवेदनावर पंडित कदम, बंडू कदम, चंद्रकांत साळुंखे, विकास सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, रवींद्र कदम, बाळू कदम, भैरू कदम यांच्या सह्या आहेत. तर सरपंच संघटनेच्या वतीने सर्वश्री तुराभ देशमुख, ऍड श्रीधर जाधव, विष्णू कोळी, विठ्ठल बेड जवळगे, उद्धव काळे, यांच्यासह तालुक्यातील अनेक गावच्या सरपंचांनी साखळी उपोषणाचा सहभाग घेऊन उपोषण करताना बळ दिले.
0 टिप्पण्या