जी. एन. पाठक आणि वैजयंती सरवदे यांचा आज सेवापूर्ती निरोप समारंभ

 जी. एन. पाठक आणि वैजयंती सरवदे यांचा आज सेवापूर्ती निरोप समारंभ 



औसा प्रतिनिधी

 महाराष्ट्र शिक्षण समिती निलंगा द्वारा संचलित महाराष्ट्र विद्यालय निलंगा येथील मुख्याध्यापक जी. एन. पाठक आणि सहशिक्षिका श्रीमती वैजयंती आप्पाराव सरवदे काळदाते हे नियत वयोमानानुसार आज दिनांक 31 ऑक्टोबर 2023 रोजी प्रदीर्घ सेवेतून निवृत्त आहेत. त्यांच्या सेवापुर्ती निमित्त मंगळवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता मातोश्री सभागृह महाराष्ट्र महाविद्यालय निलंगा येथे आयोजित कार्यक्रमासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर आणि विजयकुमार पाटील निलंगेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव व भगवान सरतापे, शिक्षणाधिकारी वंदना फुटाणे, उपशिक्षण अधिकारी प्रमोद पवार, महाराष्ट्र शिक्षण संचालनाचे सचिव प्रवीण गायकवाड, गटशिक्षणाधिकारी सुरेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमांमध्ये मुख्याध्यापक जी. एन. पाठक यांच्या मातोश्री सुमनबाई व वडील नरसिंह देव पाठक यांच्या स्मरणार्थ शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी पिण्यासाठी एक्वा फिल्टर प्लांट चा संच भेट देण्यात येणार आहे. हे सर्व निमंत्रित व शिक्षण प्रेमी बांधवांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र विद्यालय निलंगा यांच्या वतीने करण्यात येत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या