मराठा समाजाच्या साखळी उपोषणाला मुस्लिम विकास परिषदेचा जाहीर पाठिंबा.
.
औसा प्रतिनिधी
मराठा समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरू आहे.यासाठी मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले आहेत.कारण त्यांना शासनाने 40 दिवसांचा कालावधी दिला होता परंतु अद्यापही आरक्षण जाहीर केलेले नाही. त्यांची मागणी रास्त असल्यामुळे त्यासाठी जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून गरजवंत मराठा समाजाच्या बेमुदत साखळी उपोषणाला आज मुस्लिम विकास परिषद औसा तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला. यावेळी मुस्लिम विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष फहीम शेख सांगितले शासनाने मराठा समाजाच्या प्रतिक्षेचा अंत पाहू नये व तात्काळ आरक्षण द्यावे मुस्लिम विकास परिषद मनोज जरांगे पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून आरक्षणासाठी लढा देऊ असे यावेळी सांगितले. यावेळी मुस्लिम विकास परिषदेचे उपाध्यक्ष सय्यद गुलाब,औसा तालुकाध्यक्ष मनसुर रुईकर, शहराध्यक्ष नदीम सय्यद उपस्थित होते.
0 टिप्पण्या