हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीच्या अध्यक्षपदी जाफर खोजन यांची पुन्हा फेर निवड ..
जयंती निमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविणार --- जाफर खोजन
औसा प्रतिनिधी मुखतार मणियार
औसा शहरात शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांच्या जयंती निमित्त अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येते. येणाऱ्या २० नोव्हेंबर 2023 रोजी शेरे हिंद हजरत टिपू सुलतान यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते.तसेच औसा शहरात सुध्दा अनेक उपक्रम राबवून जयंती साजरी करण्यात येते. गेल्या वर्षी जाफर खोजन यांच्या अध्यक्षते खाली जयंती निमित्त शहरात चागले उपक्रम राबविले होते.तसेच यावर्षीही शहरातील हजरत टीपू सुलतान उर्दू घर येथे जयंती उत्सव निमित्त अध्यक्ष निवडी संदर्भात बैठकीचे आयोजित करण्यात आले होते.या बैठकीत सर्व टिपू सुलतान प्रेमींनी एकमताने पुन्हा औसा शहरातील सामाजिक कार्यकर्ते जाफर खोजन यांची फेर निवड करण्यात आली.त्यांच्या या फेरनिवडीबद्दल मित्र परिवाराकडून व अनेक संघटनाकडून त्यांचा अभिनंदन होत आहे.
येणाऱ्या २० नोव्हेंबर 2023 होणाऱ्या जंयतीमधे गेल्या वर्षी पेक्षा चांगले सामाजिक उपक्रम राबविणार यामध्ये रक्तदान शिबीर असेल व गरजू
विद्यार्थ्यांना शाळेमध्ये वही पेन व तसेच औसा ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना फळ वाटप व तसेच अनाथ मुलांना आश्रमशाळेत फळ वाटप करणार तसेच शहरात हजरत टिपू सुलतान यांची व्याख्यान ठेवले जाणार असे विविध सामाजिक कार्यक्रम घेऊन शेरे हिंद हजरत टिपू सुलतान रहे. यांची जयंती साजरी केली जाईल असे नूतन अध्यक्ष जाफर खोजन यांनी यावेळी सांगितले.
0 टिप्पण्या