प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांच्या पाणी समस्येवर तोडगा; दीन शाम बडा परिसरात नळ पाणीपुरवठा कामाला वेग


 प्रभाग क्रमांक ९ मधील नागरिकांच्या पाणी समस्येवर तोडगा; दीन शाम बडा परिसरात नळ पाणीपुरवठा कामाला वेग



नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना दिलासा; नगरसेवक मौलाना कलीम मुल्ला व नगरसेविका सौ. आसिफून निसा खूनमीर मुल्ला यांचा पुढाकार

औसा प्रतिनिधी 


औसा : शहरातील प्रभाग क्रमांक ९ मधील दीन शाम बडा परिसरातील नागरिकांच्या नळ पाणीपुरवठ्याच्या समस्येची दखल घेत पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आली आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले आहे. प्रभागातील पाणी समस्या दूर करण्यासाठी नगरसेवक मौलाना कलीम मुल्ला यांनी सातत्याने पाठपुरावा केला असून, महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापती तथा नगरसेविका सौ. आसिफून निसा खूनमीर मुल्ला यांनीही या कामासाठी पुढाकार घेतला आहे.


दीन शाम बडा परिसरातील नागरिकांनी पाणीपुरवठ्याच्या समस्येबाबत लक्ष वेधल्यानंतर तातडीने कार्यवाही करण्यात आली. सुरू असलेल्या या कामामुळे भविष्यात नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळण्यास मदत होणार आहे.


या उपक्रमाबद्दल परिसरातील नागरिकांनी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख, नगरसेवक मौलाना कलीम मुल्ला व नगरसेविका सौ. आसिफून निसा खूनमीर मुल्ला यांचे आभार मानले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या