महाराज परिवारास सांत्वन भेट..
औसा प्रतिनिधी
औसा येथील नाथ संस्थानचे पाचवे पीठाधीपती सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर यांच्या मातोश्री स्वर्गीय लिलाबाई ज्ञानेश्वर महाराज उर्फ आईसाहेब यांचे दुःखद निधन झाल्यामुळे श्री ओम सिद्धिविनायक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमन श्रीशैल उटगे औसख तहसील कार्यालयाचे तहसीलदार घनश्याम अडसूळ औसा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष काशिनाथ सगरे, दैनिक मनोगतचे कार्यकारी संपादक राम कांबळे, महसूल सहाय्यक चंद्रकांत राजुरे , ह भ प बाबा कदम महाराज काडगावकर यांनी स्वर्गीय लिलाबाई महाराज यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली. सद्गुरु गुरुबाबा महाराज औसेकर आणि विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सह अध्यक्ष सद्गुरु गहिनीनाथ महाराज औसेकर यांचे समवेत आदरपूर्वक चर्चा केली. यावेळी सर्वश्री मच्छिंद्रनाथ महाराज, गोरखनाथ महाराज, रवींद्रनाथ महाराज, ज्ञानराज महाराज यांच्यासह परिवारातील सदस्य उपस्थित होते.

0 टिप्पण्या