औसा येथे श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्याची जय्यत तयारी
अध्यक्षपदी अजय रवींद्र फुटाणे, उपाध्यक्षपदी विकास औदुंबर फुटाणे यांची निवड
औसा, प्रतिनिधी :
श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या ७३१ व्या संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही औसा येथील श्री संत सावता माळी चौक, माळी गल्ली येथे अखंड हरिनाम सप्ताह व श्री संत सावता माळी महाराज चरित्र कथा सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
हा धार्मिक सप्ताह बुधवार, दि. ५ ऑगस्ट २०२६ ते मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ या कालावधीत श्री संत शिरोमणी सावता महाराज मंदिर, माळी गल्ली, औसा येथे संपन्न होणार आहे.
यावर्षीच्या सोहळ्यासाठी श्री अजय रवींद्र फुटाणे यांची अध्यक्षपदी, तर श्री विकास औदुंबर फुटाणे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून, त्यांच्या नेतृत्वाखाली सोहळ्याची तयारी उत्साहात सुरू आहे.
सप्ताहादरम्यान दररोज सकाळी ७.०० ते ८.०० श्रीपूजा, दुपारी १.०० ते ५.०० महिला भजन, सायंकाळी ६.०० ते ७.०० हरिपाठ, ७.०० ते ८.०० श्री संत सावता महाराज चरित्र पारायण, रात्री ८.०० वाजता महाआरती व प्रसाद, त्यानंतर हरीजागर असा भक्तिमय कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
तसेच बुधवार, दि. १२ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता श्रीफळ हंडी, सार्वजनिक महाआरती व महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
या पवित्र सोहळ्यास सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री सचिन माळी, अध्यक्ष, माळी समाज औसा तसेच समस्त सावता भक्तांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या