बोरफळ तांड्यावर श्री गणेश मंदिराची पायाभरणी; स्नेहश्री ॲग्रोजेनिक्सचा धार्मिक उपक्रम..
औसा : प्रतिनिधी
औसा तालुक्यातील बोरफळ तांडा येथे स्नेहश्री ॲग्रोजेनिक्स प्रा. लि.च्या वतीने नवीन श्री गणेश मंदिराच्या पायाभरणीचा व विशेष पूजा सोहळ्याचा कार्यक्रम रविवारी (दि. २६ जुलै 2026) आयोजित करण्यात आला या धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक परंपरा जपत हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
गट क्रमांक ६४०/९९९, बोरफळ तांडा (जुना शिबली–धाराशिव रोड, ता. औसा, जि. लातूर) येथील कारखान्याच्या प्रांगणात दुपारी १२.३० वाजता गणपती पूजन, पायाभरणी विधी व शांतता, समृद्धीसाठी विशेष हवन करण्यात आले .त्यानंतर उपस्थित भाविक, शेतकरी व व्यवसायिक , लोकप्रतिनिधी विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिकांनी उपस्थित राहून या महाप्रसाद चा लाभ घेतला.
या पवित्र प्रसंगी औसा तालुक्यातील शेतकरी, व्यावसायिक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्री गणेश मंदिराच्या पायाभरणीचा सोहळ्यात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल, स्नेहश्री ॲग्रोजेनिक्स प्रा. लि.चे श्रीशैल उटगे, शिवम उटगे, सत्यम उटगे आणि संपूर्ण स्नेहश्री परिवाराच्या वतीने आभार मानले.




0 टिप्पण्या