अरीशा महेदी गिड्डे या चिमुकल्याचा पहिला रोजा पूर्ण..
औसा प्रतिनिधी
मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असलेला रमजान महिना गुरुवार दि.19 फेब्रुवारी पासुन सुरू झाला. रमजान महिन्यात मुस्लिम बांधव रोजा (उपवास) ठेवतात. मन व शरीर शुद्ध करण्याचा तो एक मार्ग असल्यामुळे मुस्लिम धर्मात रोजाला विशेष महत्त्व आहे.औसा शहरातील पॉवर हाऊस येथील 7 वर्षीय चिमुकली अरीशा महेदी गिड्डे यांनी आपल्या आयुष्यातील रमजानचा पहिला रोजा
दिनांक 24 फेब्रुवारी मंगळवार रोजी
उपवास ठेवून आपल्या आयुष्यातला पहिला रोजा पूर्ण केला आहे. त्याबद्दल सर्वत्र स्तरांतून कौतुक होत आहे. आजच्या या कठीण काळातही माणसाला निरोगी व चिंतामुक्त ठेवण्याचे काम रोजा करतो. रोजा असणारा व्यक्ती दिवसभर काहीही खात नाही किंवा पाणी सुद्धा पीत नाही. सध्या या वयात रोजा धरने कठीण मानले जाते मात्र औसा शहरातील पॉवर हाऊस येथील कापडाचे व्यापारी महेदी नबीसाब गिड्डे यांची मुलगी अरीशा महेदी गिड्डे या चिमुकल्यानी आपल्या आयुष्यातील पहिला रोजा आज पूर्ण केल्याबद्दल त्यांचे गिड्डे परिवारात व परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे.

0 टिप्पण्या