औसा नगरपरिषदेवर 'राष्ट्रवादी'चा झेंडा; डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वात विरोधकांच्या धुव्वा

 औसा नगरपरिषदेवर 'राष्ट्रवादी'चा झेंडा; डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वात विरोधकांच्या धुव्वा


परवीन नवाबोद्दीन शेख नगराध्यक्षपदी विराजमान; ११ पैकी ८ प्रभागांत राष्ट्रवादीचे वर्चस्व

औसा (प्रतिनिधी):

राजकीयदृष्ट्या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि चुरशीच्या ठरलेल्या औसा नगरपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने (अजित पवार गट) निर्विवाद बहुमत मिळवत ऐतिहासिक विजय संपादन केला आहे. माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या कुशल रणनीतीमुळे राष्ट्रवादीने विरोधकांचे तगडे आव्हान मोडीत काढत सत्ता काबीज केली. नगराध्यक्षपदाच्या अत्यंत चुरशीच्या लढतीत राष्ट्रवादीच्या परवीन नवाबोद्दीन शेख यांनी १३६१ मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवून औसा शहराचे प्रथम नागरिकत्व पटकावले आहे.

सत्तासंघर्षात राष्ट्रवादीची बाजी

या निवडणुकीत सुरुवातीपासूनच राजकीय वातावरण कमालीचे तापले होते. एकूण ११ प्रभागांपैकी प्रभाग १, ३, ४, ५, ६, ९, १० आणि ११ अशा ८ प्रभागांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने वर्चस्व राखले, तर भारतीय जनता पक्षाला प्रभाग २, ७ आणि ८ मध्ये समाधान मानावे लागले. शिवसेना (शिंदे गट) केवळ एका जागेवर यश मिळवू शकली.

असे आहेत नवनिर्वाचित विजयी उमेदवार:

प्रभाग क्रमांक  एक अ मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 

शांताबाई काशिनाथ कसबे  ब मधुन| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आनंद अमरदिप  बनसोडे  हे विजयी झाले आहेत.

प्रभाग क्रमांक ०२ | अ  मधुन   भारतीय जनता पक्षाचे सुनिल सिद्रामप्पा मिटकरी व ब मध्ये ऐश्वर्या पवनराज राचट्टे  हे विजयी झाले आहेत.व प्रभाग क्रमांक 03 मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 

 किर्ती ताई अशोक कांबळे व ब मध्ये अविनाश तानाजी टिके हे विजयी झाले आहेत. व प्रभाग क्रमांक 04 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 

पटेल मालनबी सालार व शेख जावेद हमीदसाब | हे विजयी झाले आहेत.

व प्रभाग क्रमांक 05 मधुन 

 हंसा मुस्तफा सय्यद व  गोंवीद विठ्ठलराव जाधव हे विजयी झाले आहेत.व प्रभाग क्रमांक 06 मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 

 कृष्णा प्रभु सावळकर व  शेख मेहरुन्नीसा मेहराज हे विजयी झाले आहेत.व तसेच प्रभाग क्रमांक 07 मधुन शिवसेना शिंदे गटाचे 

 पियुष गोपाळराव म्हेत्रे  व भारतीय जनता पक्षाचे कुलकर्णी शिल्पा संतोष  हे विजयी झाले आहेत.व तसेच प्रभाग क्रमांक 08 मधुन भारतीय जनता पक्षाचे 

 अश्विनी नागनाथ स्वामी व  आकाश शिवशंकरप्पा उटगे हे विजयी झाले आहेत.व तसेच प्रभाग क्रमांक 09 मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 

आसिफुन्निसा खुंदमीर मुल्ला व कलीमुल्ला अब्दुल अजिज हे विजयी झाले आहेत.व तसेच प्रभाग क्रमांक 10 मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 

 रफीक अब्दुल करीम मुंगले  अनिसा खादर सय्यद हे विजयी झाले आहेत.व तसेच प्रभाग क्रमांक 11 मधुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे हफीजा बेगम रहेमान कुरेशी  व शेख सबीहा बासीद ,व   प्रभाग ११ मध्ये 'क' जागेवरून स्वतः डॉ. अफसर शेख विजयी झाले आहेत.)

डॉ. अफसर शेख: विजयाचे मुख्य शिल्पकार

या विजयाचे संपूर्ण श्रेय माजी नगराध्यक्ष डॉ. अफसर शेख यांच्या नेतृत्वाला दिले जात आहे. त्यांनी आखलेली प्रचाराची रणनीती, कार्यकर्त्यांची भक्कम फळी आणि विकासाच्या मुद्द्यांवर दिलेला भर यामुळे मतदारांनी पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दर्शवला आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रवादीला नगरपरिषदेत स्पष्ट बहुमत मिळवून देण्यात झाला.

विकासाच्या नव्या पर्वाची अपेक्षा

नगराध्यक्षपदी परवीन शेख यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जल्लोष साजरा केला. अटीतटीच्या या रणसंग्रामात मिळालेला हा विजय केवळ राजकीय सत्तापालट नसून, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेने दिलेला कौल असल्याचे मानले जात आहे. आता या विजयाचे रूपांतर प्रत्यक्ष विकासकामांत आणि पारदर्शक प्रशासनात करण्याचे आव्हान नवनिर्वाचित सत्ताधाऱ्यांसमोर असणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या