औसा येथे ओबीसी मंडल आयोग लागू दिन उत्साहात साजरा"
औसा प्रतिनिधी
औसा, 7 ऑगस्ट 2025 रोजी भीमनगर, औसा येथे सम्राट युवा सामाजिक संघटना आणि मुस्लिम भिम संघाच्या वतीने मंडल आयोग लागू दिन उत्साहात व अभिमानाने साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात ओबीसी आरक्षणासाठी लढा देणाऱ्या दोन महान व्यक्तिमत्त्वांचा — बी. पी. मंडल व तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग — यांचा गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे आयोजन सम्राट युवा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष सोमनाथदादा कांबळे आणि मुस्लिम भिम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चांदभाई लोणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. त्यांनी बी. पी. मंडल व स्वर्गीय पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले.
कार्यक्रमात मुस्लिम भीम संघ या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चॉंदभाई लोणे आणि संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवीद भाई शेख, बख्शी, विशाल बनसोडे, सौदागर कांबळे, सुरज बनसोडे, युवराज चव्हाण, संतोष बनसोडे, सोनाजी बनसोडे, आकाश कांबळे, निलेश कांबळे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या घटकांना न्याय मिळावा या हेतूने 1979 साली बी. पी. मंडल यांच्या अध्यक्षतेखाली मंडल आयोग स्थापन करण्यात आला. त्यानंतर 7 ऑगस्ट 1990 रोजी तत्कालीन पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी 27% ओबीसी आरक्षण लागू करत ऐतिहासिक निर्णय घेतला. हाच दिवस सामाजिक न्यायाचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
या दिवशी ओबीसी समाजाच्या हक्कासाठीचा संघर्ष व त्याचा यशस्वी विजय लक्षात घेऊन मंडल आयोग लागू दिन साजरा केला जातो.
कार्यक्रमामध्ये ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी सुरु असलेल्या चळवळीला बळ देणे, नव्या पिढीला सामाजिक न्यायाची जाणीव करून देणे व बी. पी. मंडल आणि व्ही. पी. सिंग यांच्या कार्याची प्रेरणा घेणे, हा प्रमुख उद्देश होता.
या उपक्रमाच्या माध्यमातून समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या मूल्यांना उजाळा मिळाला असून, ओबीसी समाजासाठी हा दिवस अभिमानाचा ठरत आहे.
0 टिप्पण्या