डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अंकुश कांबळे यांना दिल्लीत समाजभूषण पुरस्कार
औसा प्रतिनिधी
औसा येथील सामाजिक कार्यकर्ते अंकुश विठ्ठलराव कांबळे यांनी 1993 स. झालेल्या प्रलयंकारी भूकंपात केलेले समाजकार्य तसेच दिव्यांग व विधवा निराधार तसेच श्रावण बाळ लाभार्थ्यांच्या प्रश्नासाठी केलेले मोर्चे आंदोलन व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचा आदर्श घेऊन केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल नवी दिल्ली येथील डॉक्टर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समितीच्या वतीने देण्यात येणारा यावर्षीचा समाजभूषण पुरस्कार अंकुश विठ्ठलराव कांबळे यांना केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड, जयंती समितीचे अध्यक्ष विनोद जाधव, कल्पना गायकवाड , खासदार अनिल बोंडे, एल एन नागराज, शिवकुमार अंबलया, लालसिंग आर्या, भावना त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. अंकुश कांबळे यांना समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी उपनगराध्यक्ष लहू कांबळे, माजी नगरसेवक अंगद कांबळे, ऍड मंजुषा हजारे, मनोज जाधव ,नदीम सय्यद, सतीश जाधव, दत्ता पुंड यांनी अभिनंदन केले आहे.
0 टिप्पण्या