करीम नगर भागात नवीन पाईपलाईन आणि रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी...खाजाभाई शेख
औसा प्रतिनिधी
औसा - करीम नगर परिसरातील पाणीटंचाई आणि खराब रस्त्यांच्या समस्येने त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी आता दिलासा मिळण्याची शक्यता आहे. या समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष
खाजाभाई शेख यांच्या नेतृत्वाखाली औसा नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करण्यात आले आहे.
या निवेदनात, संपूर्ण करीम नगर भागात नवीन पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याची आणि पाईपलाईनच्या कामामुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
याव्यतिरिक्त, बसडेपोच्या पाठीमागील बाजूस सर्वे नंबर 92 मधील पप्पू भाई शेख यांच्या फ्लॅटपासून ते सैलानी शेख यांच्या घरापर्यंत स्वतंत्रपणे नवीन पाईपलाईन टाकण्याची विशेष मागणीही करण्यात आली आहे.
युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष खाजाभाई शेख यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी जर प्रशासनाने तात्काळ पावले उचलली नाहीत, तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. यामुळे, प्रशासनाला या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे लागेल.
0 टिप्पण्या