औशात जलसमृद्ध औसा अभियानाचा जनसंकल्प मेळावा...

 औशात  जलसमृद्ध औसा अभियानाचा जनसंकल्प मेळावा...



औसा प्रतिनिधी 


औसा - आमदार अभिमन्यू पवार  यांच्या संकल्पनेतून व क्रिएटीव्ह फाऊंडेशन यांच्या पुढाकाराने "जलसमृद्ध औसा अभियानाचा जनसंकल्प मेळावा" ,जलसंधारण, जलसंवर्धन, जलजाणीव आणि विवेकपूर्ण जलवापर साठी शेतकरी कार्यशाळा चे आयोजन बुधवार दि.१३ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी १०:३० वा विजय मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आले आहे.


           या कार्यक्रमासाठी  उद्घाटक आमदार अभिमन्यू पवार, प्रमुख मार्गदर्शक आदर्श सरपंच, जलतज्ज्ञ व समाजसेवक पोपटराव पवार, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रगतशील शेतकरी सीताराम जाधव, तर प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी, प्रभारी अध्यक्ष पोलीस तक्रार प्राधिकरण महाराष्ट्र राज्य उमाकांत मिटकर राहणार आहेत. शेत तिथे रस्ता आणि मनरेगातून ग्रामसमृद्धी अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीनंतर औसा मतदारसंघात जलसंधारण व जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर करण्यासाठी एक विशेष अभियान हाती घेत असल्याची घोषणा आ अभिमन्यू पवार यांनी २३ जुलै रोजी केली होती. याच प्रयत्नाचा भाग म्हणून औसा येथे "जलसमृद्ध औसा अभियान जनसंकल्प मेळावा व 'जलसंधारण, जलसंवर्धन, जलजाणीव आणि विवेकपूर्ण जलवापर' शेतकरी कार्यशाळा" चे आयोजन करण्यात आले आहे. क्रिएटिव्ह फाऊंडेशनच्या मदतीने १३ ऑगस्ट रोजी विजय मंगल कार्यालय, औसा येथे संपन्न होणाऱ्या या कार्यशाळेला उपस्थित राहावे असे आवाहन क्रिएटीव्ह फाऊंडेशन चे अध्यक्ष अॅड परिक्षीत अभिमन्यू पवार यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या