वाढीव विजबिलाच्या विरोधात औशात मनसेचा आंदोलन.

 वाढीव विजबिलाच्या विरोधात औशात मनसेचा आंदोलन.



औसा प्रतिनिधी 

स्मार्ट मीटरच्या पाठीमागे दडलय काय?

याच्या पाठीमागे काहीतरी मोठी गडबड आणि भानगड आहे. अशा प्रकारच्या स्मार्ट मीटरची मागणी कुठल्या ग्राहकानी केली होती,माहित नाही.मग हे का आणि कशासाठी ग्राहकाच्या माथी लादलं गेलं कुणालाच पत्ता नाही.ही संकल्पना कोणाची,हे मीटर बनवले कोणी,ते बनवणारे कोण? त्याचे टेंडर कोणाला सुटले याचा थांग पत्ता नाही.या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे.स्मार्ट मीटरच्या नावाखाली उद्या अवाच्या सव्वा बिलं आली तर ग्राहकाचे कंबरडे मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही.सध्यपरिस्थितीत ग्रामीण भागात बिलाच्या बाबतीत फार मोठी गडबड आहे.एखाद्याच्या घरी एक-दोन बल्ब जरी असले तरी त्याला पिठाच्या चक्की एवढी बिलं येत आहेत.या अशा अनागोंदी कारभाराला ग्राहक वैतागलय.पण हे सांगायचं कुणाला आणि दाद मागायची कुणाकडं असा प्रश्न सध्या ग्राहकांना पडलाय.रिडिंग घ्यायला वेगळा,बिलं वाटपासाठी दुसराच,महावितरणचे कर्मचारी तिसरेच मग ग्राहकाने नेमकी दाद मागायची कोणाकडं.चार वर्षांपूर्वी अशीच चुकीची बिलं लातूर जिल्ह्यातल्या ग्राहकांना येत होती.अशा बिलाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने विद्युत वितरण कंपनीच्या कार्यालयापुढे चुलीत घालून होळी केली होती. आता पुन्हा एकदा जिल्ह्यात अशीच परिस्थिती उद्भवली आहे. आता ती बीलं भरण्यापेक्षा पेटवून देण्याशिवाय पर्याय नाही. तसेच विद्युत वितरण कंपनीने देखील ग्राहकाच्या परवानगीशिवाय असे स्मार्ट मीटर बसवून ग्राहकाची लूट करू नये अशी विनंती. महावितरण कंपनीला मनसेचे जिल्हाध्यक्ष शिवकुमार नागराळे यांनी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या