औसा शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करा व धुर फवारणी करुन शहरातील वाढत्या रोगांना आळा घाला-सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
एम.आय.एम.च्या वतीने यापुर्वी मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली होती त्यावर नगर पालिकेने कार्यवाही करुन मोकाट कुत्र्यांचे निर्बीजीकरण केले. परत एकदा औसा शहरात व गल्ली बोळात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे दररोज 20 ते 25 लोकांना मोकाट कुत्रे चावा घेत असून सदर ग्रामिण रुग्णालयामध्ये महिना सरासरी 750 लोकांना कुत्रे चावा घेत आहेत. त्यामुळे नगर पालिकेने परत एकदा मोकटा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा.
तसेच शहरात गटारीवर गवत आल्यामुळे मच्छरांची उत्पत्ती झालेली आहे ज्यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यावर धूर फावरणी करण्यात यावी.
तरी वरील बाबींवर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कामाची माहिती लेखी पत्राद्वारे कळवण्यात यावी ही विनंती अन्यथा एमआयएम व नागरीकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल.अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या