एस.व्ही.एस.एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, लातूरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण

 एस.व्ही.एस.एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, लातूरच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादरीकरण



ता.लातूर: राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत लातूर शहर महानगरपालिका व एस. व्ही. एस.एस. कॉलेज ऑफ नर्सिंग, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबिर हा उपक्रमा विद्यार्थ्यांनी "अवयवदान" या अत्यंत संवेदनशील व महत्वाच्या सामाजिक विषयावर प्रभावी पथनाट्य सादर करून जनजागृती केली.या सादरीकरणात "एक व्यक्ती अनेक जीव" ही संकल्पना प्रभावीपणे मांडत मृत्यूनंतरही इतरांचे प्राण वाचवण्याची संधी कशी असते, हे विद्यार्थ्यांनी जनमानसापर्यंत पोहोचवले. अवयवदानाचे महत्त्व, गरज व समाजातील चुकीच्या समजुती दूर करण्याचा संदेश त्यांनी दिला.

या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट फक्त माहिती देणे नव्हे, तर लोकांच्या मनात सकारात्मक विचारांची पेरणी करणे होते "अवयवदान म्हणजे आयुष्यदान"पथनाट्य सादरीकरण केलेल्या विद्यार्थ्यांना

संस्थेचे अध्यक्ष  भीमाशंकर बावगे, सचिव वेताळेश्वर बावगे, संचालिका माधुरी बावगे, प्राचार्या रुपाली गिरी, उपप्राचार्य क्षितिजा माळी, प्रा. श्रद्धा घोडके व प्रा. वैष्णवी काळे  यांनी विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा व अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या