सुलेमान खान हत्येप्रकरणी
आरोपींवर कठोर कारवाई करा -मुस्लिम भिम संघटनेची मागणी
औसा प्रतिनिधी
जामनेर (जि. जळगाव) येथे सुलेमान खान यांना मॉबलिंचिंग करून निर्घृणपणे हत्या केल्याच्या प्रकरणात आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुस्लिम भीम संघटनेकडून औसा तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चांदभाई लोणे यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सुलेमान खान यांना तथाकथित 'लव्ह जिहाद'च्या नावाखाली संभाजी भिडे समर्थकांनी खोटे आरोप करत अमानुष मारहाण केली आणि त्यातूनच त्यांचा मृत्यू झाला.
संघटनेने इशारा दिला आहे की, जर आरोपींवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई झाली नाही, तर मुस्लिम भीम संघटना रस्त्यावर उतरेल आणि पुढील आंदोलनाला संपूर्ण जबाबदार प्रशासन असेल.
निवेदन देताना संघटनेचे जिल्हाध्यक्ष नवीद शेख, महावीर बनसोडे, मजहर सिद्दीकी, सद्दाम पठाण, शेख सोहेल आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
0 टिप्पण्या