शारदा करियर इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी डंका...*

 *शारदा करियर इन्स्टिट्यूट च्या विद्यार्थ्यांचा विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी डंका...*



लातूर, दि. 18 जुलै 


शहरातील अग्रगण्य शारदा करिअर इन्स्टिट्यूटने पुन्हा एकदा गुणवत्ता आणि मेहनतीचे उत्तम उदाहरण सादर केले आहे. विविध स्पर्धा परीक्षांमध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले असून संस्थेच्या नावलौकिकात भर घातली आहे. विद्यार्थ्यांनी दाखवलेले यश हे केवळ आकड्यात मोजण्याजोगे नसून ते संस्थेच्या शैक्षणिक संस्कृतीचे प्रतीक आहे. 


        प्रतिष्ठित अशा नवोदय प्रवेश परीक्षेत संस्थेच्या ध्रुव रोंगे या विद्यार्थ्याची मेहनत, परिश्रम व सातत्याच्या बळावर प्रथम यादीत निवड झाली आहे. तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ध्रुव रोंगे, धीरज कांबळे, श्याम दगडे, अभिजीत येळीकर, श्रुती शिंदे, समीक्षा पवार हे सहा विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले आहेत. 


    संस्थेचे संचालक जळकोटे के. एस. व कापसे एम. आर. यांनी सांगितले की विद्यार्थ्यांचा हा यशस्वी प्रवास त्यांच्या मेहनती सोबतच शारदा करिअर इन्स्टिट्यूट च्या मूल्याधिष्ठित शिक्षण पद्धतीचा व समर्पित मार्गदर्शनाचा आहे. हे विद्यार्थीच आमच्या कार्याची ओळख आहेत. आम्ही यापुढेही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करत राहू. 


आम्ही सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व त्यांच्या पालकांचे अभिनंदन करतो व त्यांच्या उज्वल भविष्याची कामना करतो.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या