हिरेमठ संस्थानच्या 85 व्या वार्षिक महोत्सवानिमित्त शिवनाम सप्ताह सुरू

 हिरेमठ संस्थानच्या 85 व्या वार्षिक महोत्सवानिमित्त शिवनाम सप्ताह सुरू



औसा प्रतिनिधी 

हिरेमठ संस्थानचे लिंगैक्य गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या आशीर्वादाने 85 व्या वार्षिक महोत्सवा निमित्त दिनांक 15 ते 21 जुलै 2025 या कालावधीमध्ये कीर्तन महोत्सवाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.

 हिरेमठ संस्थांनचे मार्गदर्शक डॉ शांतवीर शिवाचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली आणि विद्यमान पिठाधीपती बाल तपस्वी निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अधिपत्याखाली वेदमूर्ती चंद्रशेखर हिरेमठ यांच्या उपस्थितीत सिद्धांत शिखामनी, तत्वामृत ग्रंथाचा पारायण सोहळा सुरू आहे. भव्य कीर्तन महोत्सवा निमित्त शिभप स्वर सम्राट सागर स्वामी महाराज लोहारेकर, दीपक कोरे महाराज माळकोंडजी, शिवानंद गिरी महाराज अंबाजोगाई,धनराज बुलबुले महाराज सामनगाव यांचे शिव किर्तन आयोजित करण्यात आले असून राजेश्वर स्वामी महाराज लाळीकर यांच्या कीर्तनाने कीर्तन महोत्सवाची सांगता होणार आहे.

*सामूहिक इष्टलिंग महापूजा व शिव दीक्षा*

85 व्या वार्षिक महोत्सवानिमित्त दिनांक 20 ते 22 जुलै 2025 या कालावधीमध्ये गुरु निरंजन शिवाचार्य महाराज यांची सामूहिक ईष्टलिंग महापूजा होणार असून सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी 9 वाजता बालतपस्वी गुरू निरंजन शिवाचार्य महाराज यांच्या अमृत हस्ते शिवदीक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दिनांक 22 जुलै रोजी डॉ. श्री. शांतवीर शिवाचार्य महाराज यांच्या दिव्य सानिध्यात महापूजा, आशीर्वचन, व धर्मसभा होणार आहे. तरी भाविक भक्तांनी दर्शन, आशिर्वचन व महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन श्री 

सुभाषअप्पा मुक्ता अध्यक्ष वीरशैव लिंगायत समाज, श्री विजयकुमार मिटकरी, नागेशआप्पा ईळेकर, सचिनआप्पा उटगे, वैजनाथ सिंदुरे, अमर उपासे, आणि वीरशैव युवक संघटना औसा यांच्या वतीने करण्यात येते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या