लातूर औसा मार्ग -आळंद गुलबर्गा या नवीन बॉडग्रेज रेल्वेमार्गाच्या मंजूरी मिळवून देण्यात यावी अभिमन्यू पवार यांना मागणीचे निवेदन..
लातूर प्रतिनिधी
लातूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाच्या विविध प्रलंबित विषयांना गती देण्यासाठी मा. आमदार अभिमन्यू पवार यांना आज अधिकृत निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे लातूर जिल्ह्याच्या शाश्वत प्रगतीसाठी आणि नागरी सुविधा वाढवण्यासाठी पुढील महत्त्वाच्या मागण्यांचा पाठपुरावा करून मंजुरी मिळवून देण्याची विनंती करण्यात आली:
लातूर - कलबुर्गी (गुलबर्गा) मार्गे औसा नवीन रेल्वे मार्गाची निर्मिती करणे.
लातूर रोड - नांदेड नवीन रेल्वे मार्गास गती देणे व महाराष्ट्र शासनाकडून ५०% टक्के निधीची वाटा मंजुरी
लातूरसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेची मागणी.
लातूर विमानतळाचा विकास व नियमित विमानसेवेची सुरुवात ची मागणी.
लातूर येथे महसूल आयुक्तालय स्थापनेची मागणी
लातूर महानगरपालिका परिवहन सेवेचा औसा शहरापर्यंत विस्तार करावा.
लातूर शहरासाठी नवीन बाह्यवळण रस्त्याची (रिंग रोड) निर्मिती करण्यात यावे.
. लातूर शहर हद्दवाढीची अंमलबजावणी करावी.
लातूर शहरात सुसज्ज नवीन बसस्थानकाची उभारणी करण्यात यावी.
वाहतूक व्यवस्थेचा मास्टर प्लॅन तयार करून अंमलात आणणे.
लातूर शहरात आधुनिक नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी तातडीने निर्णय घेणे
लातूरच्या नागरिकांना अधिक सुविधा मिळाव्यात, तसेच शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिकदृष्ट्या जिल्ह्याचा वेगाने विकास व्हावा, यासाठी या सर्व मागण्या अत्यंत गरजेच्या असून त्या तातडीने मार्गी लावण्याची आवश्यकता आहे.अशा विविध मागण्यासाठी लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने आमदार अभिमन्यू पवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी लातूर जिल्हा रेल्वे प्रवासी संघाचे अध्यक्ष आकाश कांबळे, उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी,कनिष्क बोकेफोडे , अजित काळेगोरे आदि उपस्थित होते.
या निवेदनाद्वारे मा. आमदार अभिमन्यू पवार यांना या सर्व विषयांचा पाठपुरावा संबंधित मंत्रालयांपाशी करून तात्काळ मंजुरी मिळवून देण्याची विनंती करण्यात आली आहे. विशेषतः लातूरसाठी स्वतंत्र नाट्यगृह उभारण्यासाठी त्यांनी राज्य शासनाकडे ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा लातूरच्या नागरीकांनी व्यक्त केली आहे.
0 टिप्पण्या