लातूर जिल्हा प्रलंबित असलेले विषय मार्गी लावण्यासाठी अभिमन्यू पवार यांना निवेदन.
औसा प्रतिनिधी
लातूर जिल्हा प्रलंबित असलेले विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करा अशी मागणी महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन च्या वतीने औसा विधानसभा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.त्याचे सविस्तर वृत्त असे
लातूर- कलबुर्गी (गुलबर्गा) व्हाया औसा नवीन रेल्वे मार्ग निर्मिती करावी.
लातूर रोड नांदेड नवीन रेल्वे मार्गास गती देणे व महाराष्ट्र शासनाकडून ५० टक्के वाटा मंजुरी देण्यात यावी.
लातूरकरीता स्वतंत्र विद्यापीठ मंजुरी देण्यात यावी.
लातूर विमानतळ विकास व विमानसेवा सुरु करावे.
लातूर महसुल आयुक्तालय सुरु करण्यात यावे.
लातूर शहर महानगरपालिका परिवहन सेवेचा औसा शहरापर्यंत विस्तार करण्यात यावे.
लातूर शहरासाठी नवीन बाह्यवळण रस्ता रिंग रोड तयार करावे.
लातूर शहर हद्दवाढ करण्यात यावे.
लातूर शहरासाठी सुसज्ज बसस्थानकांची निर्मिती करावी.
लातूर शहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करावे.
लातूर शहरासाठी नवीन नाट्यगृह बांधण्यात यावी.
या विविध मागण्यांचे निवेदन महाराष्ट्र पोलीस मित्र सोशल असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सचिव सुफी सय्यद शमशोद्दीन यांनी आज रोजी आमदार अभिमन्यू पवार यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.यावेळी निवेदन देताना उषाताई धावारे, आकाश कांबळे,सुरेखा घोडके आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या