हिंदी सक्ती विरोधात मराठी अस्मितेचा विजय! मनसेच्या वतीने औशात आनंदोत्सव साजरा..

 हिंदी सक्ती विरोधात मराठी अस्मितेचा विजय! मनसेच्या वतीने औशात आनंदोत्सव साजरा..



औसा प्रतिनिधी 


हिंदी सक्तीच्या विरोधात मनसे पक्षप्रमुख मा. राजसाहेब ठाकरे व शिवसेनेचे प्रमुख मा. उद्धवसाहेब ठाकरे तसेच महाराष्ट्रातील तमाम मराठी जनतेने एकजुटीने घेतलेल्या तीव्र आंदोलनात्मक भूमिकेमुळे अखेर देवेंद्र फडणवीस सरकारला हिंदी सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. ही विजयगाथा केवळ राजकीय नेतृत्वाची नसून संपूर्ण मराठी जनतेच्या अस्मितेचा आणि संघर्षाचा सन्मान आहे.


या ऐतिहासिक विजयाच्या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जिल्हा लातूरच्या वतीने औसा शहर व तालुक्यात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत साखर व पेढे वाटून विजयाचा जल्लोष करण्यात आला.


कार्यक्रमास जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहरप्रमुख तसेच विविध विभागांचे प्रमुख व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी आपले मनोगत व्यक्त करत मराठी भाषेच्या सन्मानासाठी मनसेने घेतलेल्या भुमिकेचा गौरव केला आणि भविष्यातही मराठी अस्मिता जपण्यासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या