ईद-उल-अजहा च्या निमित्ताने शहरात साफसफाई व नळाला पाणी सोडावेत - सय्यद मुजफ्फर अली इनामदार
औसा प्रतिनिधी
दि. ०७/०६/२०२५ रोजी मुस्लीम समाजाचे मुख्य सण ईद-उल-अजहा असून यानिमित्ताने शहरात साफसफाई करण्यात यावी तसेच नळाला पाणी सोडण्यात यावे जेणे करुन मुस्लीम बांधवांना सणासाठी सोईचे होईल.
ईद ची नमाज अदा करण्यासाठी किल्ला मैदान पासुन मुस्लीम बांधव एकत्रीत येऊन ईद गाह मैदानावर येतात त्यासाठी किल्ला मैदान पासुन जलालशाही चौक, गांधी चौक, लातूर वेस, सरकारी दवाखाना, ईदगाह मार्गावर जाणारा रस्ता स्वच्छ करून घेण्यात यावा, ग्रामिण रुग्णालयासमोर रोडचे चालु असलेले बांधकामाचे साहित्य त्वरीत काढुन घेण्यात यावे जेणे करुन नमाजसाठी येणाऱ्या बांधावांना अडचण येणार नाही.
तरी वरील प्रकरणी त्वरीत लक्ष देवून मागणी पूर्ण करण्यात यावी अशी मागणी एम आय एम औसा प्रमुख सय्यद मुजफ्फर अली इनामदार यांनी औसा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
0 टिप्पण्या