धमकीचे पत्र पाठविण्या-या अज्ञात इसमाला तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी - महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची मागणी
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई डिजिटल मिडियाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थभैया भोकरे यांना अज्ञात इसमाने पत्राद्वारे धमकी दिली आहे. धमकी देणा-यांना पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करावी अशा सुचना द्याव्यात अन्यथा राज्यभर पत्रकार संघाच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल.
सिंदूर ऑपरेशन यशस्वीतेनंतर बॉलीवूड अमितेने खान बंधु
यांनी पाकिस्तानचा निषेध करायचा होता. पाकिस्तान मधील अभिनेत्यांनी त्यानी देशाचा अभिमान असल्याचे दाखविले तसा आपल्या बॉलिवूडमधील अभिनेते खान बंधू यांना भारता बाबत अभिमान दाखवायला हवा होता, असे परखड मत दिनांक १५/०५/२०२५ रोजी प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ भोकरे यांनी केले होते. त्याबाबत अज्ञात इसमाने खान बंधुची तु माफी माग नाही तर तुला उडून देऊ असे धमकीचे पत्र पाठवले आहे हे. धमकीचे पत्र पाठवण्याऱ्या माथेफिरूला लवकरात लवकर अटक करून कडक कारवाई करावी अन्यथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई राज्यभरात लोकशाही पद्धतीने अंदोलन करेल. याची सर्वस्वी जबाबदारी राज सरकारची राहिल,
सिध्दार्थ भोकरे हे डिजिटल मिडियाच्या पत्राकारांना न्याय मिळवून देण्यासाठी संपुर्ण महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. परवाच त्यांचे लातूर व नांदेड येथे मोठ मोठे कार्यक्रम झाले आहेत उर्वरित जिल्ह्यातील दौरे यशस्वी करण्यासाठी पोलीस प्रशासनाने त्यांना संरक्षण द्यावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई डिजिटल मिडिया औसा तालुक्याच्या वतीने तहसीलदार औसा यांना निवेदन देण्यात आले यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष शिवाजी मिसाळ, बाळकृष्ण कदम,बळीराम निकम , रमेश राठोड, एम बी मणियार आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या