अजीम विद्यालयातील शेख सुफियान मुजहीद या विद्यार्थ्यांची INSPIRE AWARD MANAK योजनेसाठी निवड.....

 अजीम विद्यालयातील शेख सुफियान मुजहीद या विद्यार्थ्यांची INSPIRE AWARD MANAK योजनेसाठी निवड.....


भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग व राष्ट्रीय नवोपक्रम प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या INSPIRE AWARD MANAK योजनअंतर्गत सन 2024-25 साठी राज्यातील एकूण 2581 विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. यामध्ये लातूर जिल्ह्यातून 31 विद्यार्थ्यांची आणि औसा तालुक्यातून 4 विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

यापैकी अजीम माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 7 वी वर्गात शिकत असलेला शेख सुफियान मुजहीद या विद्यार्थ्यांनी विशेष कामगिरी केली आहे.

या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नावीन्यपूर्ण विज्ञान प्रयोगाची निवड INSPIRE AWARD MANAK योजनेसाठी झाली आहे. या विदयार्थ्यांस विज्ञान जेष्ठ शिक्षक श्री. माशाळकर एस. एन. यांनी योग्य मार्गदर्शन केले आणि त्यांचे विशेष योगदान लाभले.

औसा तालुक्यातून 4 विध्यार्थ्यांची निवड झालेल्या पैकी 3 विद्यार्थी हे आमच्या संस्थेअंतर्गत चाललणाऱ्या विद्यालयातील आहेत ही विशेष बाब आहे.

या गौरवप्राप्त विदर्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक हिंदुस्थानी एज्युकेशन सोसायटी, औसा चे संस्था अध्यक्ष प्रा. संजय जी कुलकर्णी सर, संस्था सचिव डॉ. अफसर शेख साहेब, श्री. सुलेमान शेख साहेब, मुख्याध्यापक श्री. शेख एन. आय. साहेब, पर्यवेक्षक श्री. दानिश शेख सर, शेख टी. एम सर, मेटे एस. व्ही. सर व विज्ञान प्रमुख सौ. दुरुगकार मॅडम तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले तसेच पुढील स्पर्धेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या