अहिल्यादेवी होळकर जयंती सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन..
औसा प्रतिनिधी
पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त सार्वजनिक जयंती समिती व होळकर प्रतिष्ठान औसा यांच्या वतीने शनिवार दिनांक 31 मे 2025 रोजी सकाळी आठ वाजता आमदार अभिमन्यू पवार यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण व प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष किरण उटगे, आणि डॉक्टर अफसर शेख, सुनील मिटकरी व भरत सूर्यवंशी, भाजपाचे जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमर खानापुरे, पोलीस निरीक्षक सुनील रेजितवाड, सुभाष जाधव, दौलत बंडगर, सुनील उटगे, सौ. कल्पना डांगे, ॲड मंजुषा हजारे, सदानंद शेटे, हनुमंत राचट्टे, गोविंद जाधव, बंडू कोदरे, गोपाळ धानोरे, उद्धव काळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तसेच शनिवारी सायंकाळी चार वाजता पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक मुख्य रस्त्यावरून काढण्यात येणार आहे तरी या कार्यक्रमास हजारोच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन होळकर प्रतिष्ठान औसा आणि सार्वजनिक जयंती समिती यांच्या वतीने करण्यात येते.
0 टिप्पण्या