वक्फ अमेंडमेंट बिल रद्द करण्याच्या विरोधात औसा तहसील कार्यालयासमोर एम आय एम चे धरणे आंदोलन..
औसा प्रतिनिधी
केंद्र शासनाने लोकसभेमध्ये वक्फ दुरुस्ती कायदा 2025 हा काळा कायदा मंजूर केला असून सदरचा कायदा हा मुस्लिम समाजाला त्यांच्या हक्कापासून वंचित करणारा तसेच मुस्लिम समाजाचा हक्कावर गदा आणणारा आहे. आमच्या पूर्वजांनी मुस्लिम समाजाच्या उन्नतीसाठी व धार्मिक दर्गा मस्जिद, ईदगाह, इमामबाडे, कब्रस्तान, अशुरखाने, खानखाह, तकिया आदिसाठी हे जमीन देवाच्या नावावर वक्फ केलेली आहे व सदाचे वक्फ आधिन असून मुस्लिम समाजाला या कायद्याने त्रास होणार आहे. केंद्र सरकारने हा कायदा सर्व मुस्लिम समाजाच्या वंचित घटकासाठी आणला असल्याचे गाजावाजा करीत आहेत त्यामध्ये इतर समाजाच्या लोकांची घुसखोरी करण्यासाठी सदरचा कायदा दुरुस्ती करण्यात आला आहे, परंतु संविधान पायमल्ली करून सत्तेच्या बळावर सदर कायदा बनविण्यात आलेला आहे तरी सदरील कायदा त्वरीत रद्द करण्यात यावा यासाठी औसा येथे एम आय एम व मुस्लिम समाजाच्या वतीने औसा तहसील कार्यालय समोर आंदोलन करून औसा तहसीलदार मार्फत महामाहीम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यातआले. यावेळीएम आय एम औसा प्रमुख सय़्यद मुजफ्फर अली इनामदार, शेख नय़्युम, शेख अलीम, शेख मुशिर, हारुणखा पठाण, अजहर कुरेशी, इस्माईल बागावान, इरफान बागवान,सोहेल सौदागर, इरशाद तडोले, शेख इरफान, शेख इम्रान, शेख कलीम, सय़्यद हाफेज,आदि उपस्थित होते.
0 टिप्पण्या