ज्ञानसिंधू भवनाच्या भूमीपूजन निमित्त भक्तीसंध्येचा लाभ घ्यावा - ब्रह्मकुमारी नंदा बहेणजी

 ज्ञानसिंधू भवनाच्या भूमीपूजन निमित्त  भक्तीसंध्येचा लाभ घ्यावा - ब्रह्मकुमारी नंदा बहेणजी



औसा प्रतिनिधी 

प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय औसा येथील ज्ञान सिंधुभवांच्या भूमिपूजन सोहळ्याचे सोमवार दिनांक 21 एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता आयोजन करण्यात आले असून या सोहळ्यानिमित्त प्रजापिता ईश्वरीय ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय मुख्यालय माउंट आबू येथील वरिष्ठ राजयोग शिक्षिका ब्रह्मकुमारी डॉक्टर उषा दिदी यांचे शिव परमात्मा द्वारा कठीण सुखी जीवनाचे मूल्य या विषयावर अध्यात्मिक प्रवचन होणार आहे. औसा नगरीच्या पावन भूमीत भाग्य निर्माण करणारा हा शुभप्रसंग घडत असून शिव परमात्मा कठीण दिव्य ज्ञानाची अनुभूती करण्याची एक दिव्य संधी या सोहळ्यामध्ये मिळणार असून वरिष्ठ राजयोगी शिक्षिका डॉक्टर उषा दिदी ह्या गेल्या 55 वर्षापासून स्वयं व्यवस्थापन आणि भगवद्गीतेचे शतशार अशा अनेक विषयावर देश विदेशात त्यांचे प्रवचन व ईश्वरीयज्ञानाचे प्रसारण करीत आहेत अशी माहिती ब्रह्माकुमारी नंदा बहिण जी लातूर यांनी औसा

 येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दिली. याच सोहळ्यामध्ये सुप्रसिद्ध संगीत तज्ञ डॉक्टर राम बोरगावकर यांची शिवचरणी एक भक्ती संध्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी कर्नाटक राज्यातील वरिष्ठ राजीव ब्रह्मकुमार प्रेम भाई यांचे आशीर्वचन होणार असून याप्रसंगी हिरेमठ संस्थांचे डॉक्टर लिंक शिवाचार्य महाराज, आमदार अभिमन्यू पवार, माजी मंत्री बसवराज पाटील, डॉक्टर अर्चनाताई पाटील चाकूरकर, तहसीलदार घनश्याम अडसूळ, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चौधरी, मुख्याधिकारी मंगेश शिंदे, वीर सेवा समाजाचे अध्यक्ष सुभाष आप्पा मुक्ता, आणि व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सुरेश आप्पा ठेसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय औसा केंद्राच्या नियोजित ज्ञान सिंधू भवनच्या भूमिपूजन प्रसंगी निमंत्रित बंधू भगिनींनी हजारोंच्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असे आवाहन राजयोगिनी ब्रह्मकुमारी नंदा बहिणी यांनी केले. यावेळी ब्रह्मकुमारी पुण्या बहीण जी, औसा केंद्र संचालिका सुरेखा बहिण जी, ब्रह्माकुमार धनंजय कोपरे, आणि युवराज हलकुडे यांची उपस्थिती होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या