औसा येथे निवडणूक खर्च निरीक्षकांकडून उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी

 औसा येथे निवडणूक खर्च निरीक्षकांकडून उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची तपासणी


औसा : २३९ औसा विधानसभा मतदार संघातील उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची ताळमेळ बैठक व तपासणी निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांनी दि. ०९/११/२०२४ रोजी केली व उमेदवार प्रतिनिधी तसेच लेखापथकातील कर्मचाऱ्यांना योग्य त्या मार्गदर्शक सूचना केल्या.


औसा तहसिल कार्यालयात शनिवारी डॉ. रामसिंह गुर्जर यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारांचा निवडणूक खर्च, ताळमेळ बैठक पार पडली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीरदार श्री. घनश्याम अडसूळ, सहाय्यक खर्च निरिक्षक दत्ता बद्रुपे, नोडल अधिकारी खर्च संनियंत्रण कक्ष राजू गुणाले व समद शेख, लेखापथकातील अश्विन झिंजुरे यांच्यासह कर्मचारी व उमेदवार यांचे प्रतिनिधी प्रथम लेखा तपासणीस उपस्थित होते.


या बैठकित औसा मतदार संघातून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या अनुषंगाने ताळमेळ बैठक घेण्यात आली. या वेळी निवडणूक खर्च निरीक्षक डॉ. रामसिंह गुर्जर यांनी उमेदवार प्रतिनिधींना दैनंदिन खर्चाचे लेखे ठेवण्याबाबत व वेळीच खर्च पथकास सादर करण्या बाबत सूचना केल्या. तसेच गैरहजर उमेदवार / प्रतिनिधी यांना नोटीस देण्याच्या सूचना केल्या. सर्व उमेदवारांनी बँकेत खाते काढून निवडणूक प्रचाराचा खर्च सदर खात्यातून करावा व वाहनांचा खर्च करताना परवानगी काढूनच सदर खर्च करण्याबाबत सूचना केल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या