युवराज म्हेत्रे यांची अमरावती येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नतीने बदली सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव

 युवराज म्हेत्रे यांची अमरावती येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नतीने बदली


सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव 




औसा प्रतिनिधी 


औसा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे यांची अमरावती येथे सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. यामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात असून उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी पदोन्नती झाल्याने सर्व स्तरातून गट विकास अधिकारी म्हेत्रे यांच्यावर सरपंच संघटना, विविध शासकीय अधिकारी,कर्मचारी वर्ग यांच्याकडून पदोन्नती मिळाल्याबद्दल पेढे वाटून,सत्कार करून अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे.

शासन निर्णयाने प्रमाणे निवड सूची वर्ष २०२३-२४ करिता महाराष्ट्र विकास सेवा गट-अ मधील गट विकास अधिकारी या संवर्गातील अधिकाऱ्यांना उप मुख्य कार्यकारी अधिकारी या संवर्गात तात्पुरती पदोन्नती देण्यात येत असून सामान्य प्रशासन विभाग पदोन्नतीने नियुक्तीसाठी विहतीत केलेल्या महाराष्ट्र शासकीय गट-अ व गट-ब पदांवर सरळसेवेने व पदोन्नतीने नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम, २०२१ मधील तरतुदीच्या अधीन नागरी सेवा मंडळाच्या शिफारशी तसेच सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने सदर गटविकास अधिकारी युवराज बेबीताई म्हेत्रे यांची अमरावती येथे सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी निवड करण्यात आली असल्याचे पत्र नुकतेच प्राप्त झाले आहे.

औसा पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष कार्यतत्पर गटविकास अधिकारी म्हणून युवराज बेबीताई म्हेत्रे यांची सर्वत्र ओळख आहे. औसा पंचायत समिती ही सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टी मुळे चर्चेत असणारी पंचायत समिती असून सर्व अधिकारी यांच्यावर एक मजबूत पकड ठेवून तालुक्यात विविध क्षेत्रात जिल्ह्यात औसा तालुका पहिल्या क्रमांकावर घेऊन जाणारे सर्व गुण संपन्न गटविकास अधिकारी म्हेत्रे  यांच्या रुपाने औशाला लाभले होते.

त्यांनी आपल्या सर्व कर्मचारी वर्गात शिस्त लावून देत पुर्ण वेळ ऑफिसमध्ये बसून आलेल्या तक्रारी तात्काळ सोडवण्याचा दणका उठवत विविध विभागात विविध योजनांच्या माध्यमातून तालुक्यांला एक आदर्श घालून देत आ.अभिमन्यू पवार यांची शेत रस्ता यशस्वी संकल्पना राबवत देशाला दिशादर्शक शेतरस्ता पॅटर्न करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली,त्यासोबतच सिंचन विहीर, जनावरांचे गोठे, करवसुली यांच्या सह अनेक कामामध्ये जिल्ह्यामध्ये औसा तालुका प्रथम क्रमांकावर घेऊन जाण्यासाठी धडपडत होते.त्यांच्या कार्यकाळात नरेगा विभागास उत्कृष्ट कामामुळे पुरस्कार ही भेटला आहे.त्यामुळे औसा तालुक्यात त्यांची लोकप्रियता वाढत होती. झिरो पेंडसी ठेवणारे गटविकास अधिकारी अशी त्यांची ओळख होती. तात्काळ काम करणारे अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात होते.

        औशाला गटविकास अधिकारी युवराज बेबीताई म्हेत्रे यांच्या कार्यपध्दतीचे कौतुक होत होते. त्यांची बदली होऊन त्यांची पदोन्नती अमरावती येथे  उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली असून लवकरच ते पदभार घेणार असल्याचे समजते. 

म्हेत्रे यांच्यासारखे कार्यतत्पर , नियोजन बद्ध व शिस्तप्रिय, सर्वात मिळून मिसळून राहणारे अधिकारी जर प्रत्येक तालुक्याला लाभले तर शासकीय योजना तळागाळातील सर्वसामान्य नागरीकांना मिळण्यास अडचण येणार नाही. ज्यांनी आपल्या कार्यातून तालूक्यांची आदर्श पंचायत समिती अशी ओळख तयार केली.त्यांच्या सारखा कार्यतत्पर अधिकारी त्याच्या ठिकाणी औशाला कोण येईल ?याची चर्चा सध्या तालुक्यामध्ये जोरदार सुरू आहे.तर अनेक सरपंच, गुत्तेदार यांची बिले पेंडिंग आहेत याबाबत ते ही लोकं कधी बजेट येईल? येणारे गट विकास अधिकारी कसे असतील, आपलं अन् त्याचं जमेल का? अशी विवीध प्रकारची चर्चा पंचायत समिती आवारामध्ये सुरु असल्याचे समजते...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या