औसा नवीन बस स्थानका नंतर प्रवाशाची गैरसोय

 औसा नवीन बस स्थानका नंतर प्रवाशाची गैरसोय

 


औसा प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने औसा शहरातील नवीन सुसज्ज बस स्थानकाची उभारणी झाल्यानंतर दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले औसा येथील नवीन बस स्थानक प्रवासी जनतेसाठी सुरू केल्यानंतर मात्र प्रवाशांची गैरसोय झाल्याचेच दिसून येत आहे नवीन बस स्थानकामध्ये कोणकोणत्या गाड्या धावणार आणि जुन्या बस स्थानकावरून कोणत्या बसेस धावणार याचे सविस्तर वेळापत्रक राज्य परिवहन महामंडळाच्या औसा आगाराने लावलेले नसल्यामुळे प्रवासी जनतेमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे लांब पल्ल्याच्या एसटी बस नवीन बस स्थानकातून जात आहेत अशी फक्त चर्चा असून सविस्तर वेळापत्रक नवीन आणि जुन्या बस स्थानकातून धावणाऱ्या एसटी बसचे लावण्यात यावे अशी मागणी प्रवासी जनतेतून होत आहे कोणी बस स्थानकामध्ये अद्यावत वेळापत्रक लावल्यानंतर प्रवाशांची गैरसोय तळणार आहे या कामी राज्य परिवहन महामंडळाच्या औसा आगारप्रमुखांनी तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या