लाडक्या बहिणी ठरतील विजयाच्या शिल्पकार
औसा प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित दादा पवार यांनी राज्यातील 21 पासून 65 वर्षे वयोगटातील महिलांना मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेतून आर्थिक आधार दिला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्यांना लघु व कुटीर उद्योगासाठी दिलेले प्रोत्साहन आणि एसटी बस मध्ये प्रवास करण्यासाठी पन्नास टक्के दिलेली सवलत तसेच लेक लाडकी योजनेतून मुलीच्या जन्माचे करीत असलेले स्वागत अशा कल्याणकारी योजना राबविल्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणी महायुतीच्या उमेदवाराच्या विजयासाठी सरसावल्या असून लाडक्या बहिणीच आमदार अभिमन्यू पवार यांच्या विजयाच्या शिल्पकार ठरतील अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजनेच्या औसा तालुका समितीच्या अध्यक्षा सौ भाग्यश्री यादव यांनी दिली.
0 टिप्पण्या