आप्पांना एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल* *महायुती प्रचारार्थ ऋषिकेशदादा कराड यांच्या दौऱ्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद..

 *आप्पांना एकच कॉल आणि प्रॉब्लेम सॉल*

*महायुती प्रचारार्थ ऋषिकेशदादा कराड यांच्या दौऱ्याला मतदारांचा मोठा प्रतिसाद..



          लातूर ग्रामीण मतदार संघातून निवडून गेलेले काँग्रेसचे आमदार पुन्हा कधी गावात आले का? त्यांनी कोणाचे प्रश्न सोडविले का‌? जनतेला भेटतात का? विकास कामासाठी निधी दिला का? असे अनेक प्रश्न उपस्थित करून जनतेच्या प्रश्नाशी काही घेणं देणं त्यांना नाही तेव्हा अशा निष्क्रिय आमदाराला पराभूत करून जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे, जनतेला सहजरित्या उपलब्ध होणारे, फोनवर काम करणारे महायुतीचे उमेदवार आ. रमेशअप्पा कराड यांनाच प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी केले.

        लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आ. रमेशआप्पा कराड यांच्या प्रचारार्थ भाजपाचे युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांनी लातूर तालुक्यातील गादवड, तांदूळजा, पिंपळगाव आंबा, भोसा, निळकंठ, मसला, भिसेवाघोली, वाडीवाघोली, खुटेफळ, माटेफळ, भोईसमुद्रा, तांदुळवाडी, जवळा (बु) या गावाचा दौरा करून मतदारांशी संवाद साधला आणि आ. रमेशआप्पा कराड यांचा विजय ही काळाची गरज असल्याचे पटवून दिले.

       विविध गावच्या प्रचार दौऱ्यात युवा नेते ऋषिकेशदादा कराड यांच्या समवेत तालुकाध्यक्ष बन्सी भिसे, ओबीसी मोर्चाचे भागवत सोट, युवा मोर्चाचे संजय ठाकूर, गोपाळ पवार, अशोक सावंत, भैरवनाथ पिसाळ, संभाजी वायाळ, तानाजी ढोबळे, श्यामसुंदर वाघमारे, चंद्रकांत वागस्कर, संभाजी लोखंडे, हनुमंत राजमाने, बाबासाहेब भिसे, तानाजी ठोंबरे, बापू देवकर, शुभम खोशे, किरण रोंगे, विकास लोंढे, प्रशांत शिंदे, अमोल लोमटे, विश्वर बुलबुले, प्रशांत सोट, सिद्धाराम चव्हाण, अंकुश गंगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

        भाजपाच्या नेतृत्वातील केंद्रशासन आणि राज्यशासन यांच्या माध्यमातून गोरगरीब सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून सुरू केलेल्या विविध योजनेची सविस्तर माहिती देऊन ऋषिकेश दादा कराड यांनी लातूर ग्रामीण मतदार संघातील गावागावात वाडी वस्तीत आ रमेशआप्पा कराड यांच्या माध्यमातून झालेल्या विविध विकास कामाची माहिती दिली. ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि भावी पिढीच्या कल्याणासाठी येथे 20 नोव्हेंबर रोजी कमळ चिन्हा समोरील बटन दाबून आ रमेशआप्पा कराड यांना आशीर्वाद देऊन महायुतीला प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन केले.  प्रत्येक गावात मतदार बंधू-भगिनीसह असंख्य भाजप व मित्र पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या